Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»मोठी बातमी : 15 शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून 97 लाख रुपये लाटले!
    उत्तर महाराष्ट्र

    मोठी बातमी : 15 शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून 97 लाख रुपये लाटले!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 14, 2025Updated:March 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    15 शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून 97 लाख रुपये लाटले

    चाळीसगावातील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिवासह मुख्याध्यापक व क्लार्क विरोधात गुन्हा दाखल
    चाळीसगाव (प्रतिनिधी) सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्कने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शासनाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. एकूण 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करून 97 लाख रुपये लाटण्यात आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात सचिव व मुख्यध्यापकासह क्लार्कविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई वय (50 रा. उंटवाडी तिळकेनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विलास भोई हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कामकाज पाहतात. चाळीसगाव शहरात महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा मालेगाव रोड लगत आहे. ही शिक्षण संस्था खाजगी अनुदानित असून सध्या या संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक चाळीसगाव) हे असून मुख्याध्यापक अभिजीत जगन्नाथ खलाणे (रा. धुळे रोड जयहिंद हायस्कूलजवळ चाळीसगाव) व क्लर्क ज्ञानेश्वर दगा महाजन (रा. तेजस कोणार्क धुळे रोड चाळीसगाव) हे आहेत. शिक्षण संस्थेतील सर्व कामकाज हेच पाहतात. दरम्यान जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शासनाकडून येणाऱ्या पगाराच्या अनुदानातून सचिव, मुख्याध्यापक व क्लर्क यांनी काही शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर बळजबरीने संमती पत्रावर सह्या घेतल्या आहेत व काही शिक्षकांची कोणत्याही प्रकारे संमती न घेता बेकायदेशीररित्या व शासनाचा कोणताही नियम व आदेश 2006 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारातून स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम कपात केली आहे. एकूण 15 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुदानातून 97,01,100 रुपये इतकी रक्कम कपात करण्यात आलेली आहे.

    #chalisgaon #crime #fraud
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif