विधवेने वाटले सौभाग्याचे वाण

0

अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक, महिलांना केले आवाहन

लोकशाही न्यूज नेटवर्क

संक्रांतीच्या पाश्वभुमिवर सौभाग्यवती महिलांकडून सौभाग्याचे वाण वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र ज्या महिला विधव, परितक्त्या अश्या महिलांना या कार्यक्रमांध्ये कूठलाच मान दिला जात नसल्याने समाजात विषमतेची फळी निर्माण झाली आहे. या बंधणाला झूगारूण विधवा, परितक्या महिलांना देखील जगण्याचा सन्मान मिळावा यासाठी एका विधवा महिलेने सौभाग्याचे वाण वाटत नवा पायंडा रचला आहे. दरम्यान या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

शहरातील नारायणवाडी परिसरातील रहिवासी मंगल धुमाळ हयाचे पती मयत झाले आहे. पती नसल्याने कूठल्याही कार्यक्रात मान सन्मान मिळत नसल्याने हि खंत मनाशी ठेवत त्यांनी विधवा, परितक्त्या महिलांना देखील सन्मानाने जगता याव याकरिता समाजातील विधवा, परितक्त्या, सौभाग्यवतींसाठी वाण वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. शहरातील धुमाळ कोचिंग क्लासेस मध्ये हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी व्यासपिठावर शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील, उज्ज्वला देवरे, मिनाक्षी निकम,मंगला धुमाळ, उमा चव्हाण आदी उपस्थित होत्या. यावेळी मिनाक्षी निकम, उज्ज्वला देवरे व प्रतिभा चव्हाण यांनी आपले विचार माडंले. समाजात अजुनही अनिष्ठ रूढी परंपरा आहेत. याच परंपरा माणूस म्हणून जगण्याचा अधिकारी महिलेकडून काढून घेतात. जसे सौभ्याग्यवतींना देखील समाजात सन्मानाच स्थान दिल जाते त्याच प्रमाणे विधवा, परितक्त्या यांना देखील सन्मानीत करायला हव. या माध्यमातून सर्व महिलांनी यापूढे संक्रातींचे वाण वाटपाच्या कार्यक्रमात अश्या महिलांना देखील सन्मानित करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मी विधवा आहे. पतिचे निधन झाल्यानंतर आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात कूठलेच स्थान मिळत नव्हते. विधवा, परितक्त्या यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सामाजिक बंधणे तोडत नवा पायंडा रचला, प्रत्येकाने तो अंगिरावा हि अपेक्षा

मंगल धुमाळ, चाळीसगाव

Leave A Reply

Your email address will not be published.