हृदयद्रावक.. घरात मृतदेह अन् कुटुंबियांनी केलं मतदान

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात काल 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं.असंख्य नागरिक, नेते, सेलिब्रिटींनी घराबाहेर पडत मतदान केलं. जळगावच्या चाळीसगावमधून मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.  घरातील महिलेचा मृत्यू झालेला असतानाही त्या घरातील इतर कुटुंबियांनी बाहर पडून मतदानाचे कर्तव्य पार पाडलं. या दृश्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. ही घटना समाजासाठी मोठा धडा देणारी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कळमळू गावातील ही घटना आहे. तेथे राहणारे राजेंद्र बच्चे यांच्या पत्नीचे मतदानाच्या दिवशीच (20 नोव्हेंबर) निधन झाले. घरातील कर्ती स्त्री गेल्याने सर्वच शोकाकुल अवस्थेत होते. राजेंद्र यांच्या मुलाची चार महिन्यांपूर्वीच अग्निवीर भरतीत निवड झाली होती. मुलगा हा सैन्य दलाच्या प्रशिक्षणासाठी गेला होता, त्यामुळे तो त्याच्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी देखील येऊ शकला नाही. राजेंद्र बच्चे, त्यांची मुलगी आणि इतर कुटुंबियांनीच त्या महिलेला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. घरात एवढा दुःखद प्रसंग घडूनही बच्चे कुटुंबिय डगमगले नाहीत. त्यांनी घराबाहेर पडून त्यांचे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. त्यांच्या या धैर्याचे, राष्ट्राप्रती असलेल्या निष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.