शहीद हेमंत जोशी क्रीडांगण एलईडी दिव्यांनी उजळले

0

गुढीपाडव्याच्या पूर्वसंख्येला क्रीडांगणावर पथदिव्यांचा शुभारंभ

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले क्रीडांगणाला खा.  उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून सुमारे तीन कोटीपेक्षा अधिक निधीतून इनडोअर स्टेडियम तसेच मैदानाचे विस्तारीकरण संरक्षण भिंत कमानी असा चौफेर विकास करण्यात आला होता. मात्र रात्रीच्या प्रसंगी या भल्या मोठ्या क्रीडांगणावर अंधार असल्याने परिसरातील नागरिकांसह खेळाडूंना सायंकाळी सराव करताना अडचणी येत होत्या ही अडचण दुर करण्यासाठी खासदार निधीतून या क्रीडांगणावर मोठ्या क्षमतेचा प्रकाश देणारे आकर्षक पथदिवे बसविण्यात आल्याने या क्रीडांगणाचा दिवसरात्र वापर करता येणे शक्य असून ज्या गावातील क्रीडांगणे विकसित असतात तेथील नागरिकांना आपल्या आरोग्यासोबत खेळाडूंना आपल्या अंतर्गत गुणांचा विकास करणे अधिक सुलभ होते ही भावना उन्मेशदादा पाटील यांनी मनाशी ठेवून हे क्रीडांगण लख्ख दिव्यांच्या प्रकाशाने उजळले आहे. अशी भावना उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका सौ. संपदाताई पाटील यांनी व्यक्त केले आहे.

त्यांच्या शुभहस्ते आज शहरातील नेताजी पालकर चौक परिसरात असलेल्या शहीद हेमंत जोशी क्रीडांगणावर नुकतेच खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून बारा मीटर उंचीचे भव्य एलईडी पथदिव्यांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, सचिव डॉ. विनोद कोतकर ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस एड. प्रशांत पालवे, डॉ. सि.टी.पवार डॉ. मीनल माळी, डॉ.शैलेन्द्र पवार, डॉ.प्रकाश शिंपी, उद्योजक केशव कोतकर, माजी नगरसेवक रामभाऊ औशिकर,ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब नागरे, माजी नगरसेवक जगदीश महाजन, विजय देसले, शंकर पवार, शुभम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे, डॉ.सी. टी.पवार , डॉ.विनोद कोतकर, सौ संपदाताई पाटील यांनी दिव्यांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले की खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे दूरदृष्टी व नियोजनाचा चाळीसगावकरांना सतत लाभ झाला आहे. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण उन्मेश पाटील या युवा खासदारांकडे पाहिले जात असल्याची भावना योगाचार्य बाबासाहेब चंदात्रे यांनी व्यक्त केली.

या परिसरात दुरावस्था असलेल्या क्रीडांगणावर वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्याने आपल्या आरोग्याची काळजी घेणे येथील तरुणांसह शहरवासीयांना शक्य होणार आहे. अशी अपेक्षा डॉ. सी.टी. पवार यांनी व्यक्त केली. चाळीसगाव एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर म्हणाले की या मैदानाचा विकास झाल्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी हक्काचं क्रीडांगण उपलब्ध झाले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम गवळी आभार निलेश देसले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन वाघ, सौरव पाटील, गणेश पाटील, सर्वेश पिंगळे, मुकेश गोसावी, विनायक वाघ, योगेश गव्हाणे, शिवराज पाटील, ऋषिकेश पाटील, कल्पेश मालपुरे, निलेश देसले, भटू घटी, चेतन पाटील, निलेश चौधरी, भूषण पाटील,शुभम पाटील, बबलू पाटील, हेमंत पाटील,पंकज इंगळे, निलेश मिस्त्री यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.