चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
पशुसंहार करणारा नर जातीचा बिबट्याला १० रोजी सकाळी बहाळ ता.चाळीसगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे.
बहाळ परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे हल्ले सुरूच होते. बिबट्याने गिरणा परिसरात धुमाकूळ घातला होता. येथील भागात आदल्या दिवशी गोऱ्हा ठार केला होता. वन विभागाने ज्या शेतात दोन पिंजरे ठेवले होते, त्या पिंजऱ्यात दररोज अदलून बदलून खाद्य ठेवले जात होते. ट्रॅप कॅमेऱ्यात देखील बिबट्या हा कैद झाला होता.1 महिन्यात बिबट्याने १५ जनावरे फस्त केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी संदीप भट यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
वनसंरक्षक धुळे दि. वा. पगार, उपवनसंरक्षक (जळगाव) विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक (जळगाव) सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, विवेक देसाई, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे वनपाल आर. व्ही. चौरे,नरक्षक जी. एस. पिंजारी, चंद्रशेखर पाटील, अश्विनी ठाकरे, राहुल पाटील, काळू पवार, महेंद्र शिंदे, रवी पवार, संजय चव्हाण, दिनेश कुलकर्णी, राहुल मांडोळे, ज्ञानेश्वर पाटील, जुगराज गढरी, अशोक पाटील, सिद्धार्थ वाघ यांनी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मदत केली. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली.