Saturday, January 28, 2023

चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात नाशिक विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा संपन्न

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय (Chaitanya Ayurveda College) येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra University of Health Sciences) व्दारे नाशिक विभागीय (Nashik Divisional) निवड चाचणी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यात कबड्डी, खो-खो, व्हालीबॉल, बास्केटबॉल, अथेलेटिक्स क्रीडा प्रकार घेण्यात आले व विद्यार्थ्यांची निवड पुढील आंतरविभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली.

या क्रीडा स्पर्धा निवड चाचणी साठी नाशिक विभागातील वैद्यकीय, आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग या सारख्या विविध महाविद्यालयातील ६०० विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन दि. १०.१०.२०२२ रोजी पूर्व खान्देश कुष्ठ सेवा मंडळाचे सह सचिव अँड. धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोज मोरे व प्रभारी प्राचार्य डॉ. माणिक पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

विभागीय निवड चाचणीसाठी स्पर्धेचे आयोजन, व्यवस्था तसेच क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. अरुणा चौधरी, उपप्राचार्य डॉ. सतीश शिंदाडकर, डॉ. माणिक पाटील, डॉ. प्रशांत पुराणिक व क्रीडा संचालक राजेंद्र पी. चौधरी व सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे