Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»विदर्भात 15 दिवसात सहा वाघांचा मृत्यू !
    महाराष्ट्र

    विदर्भात 15 दिवसात सहा वाघांचा मृत्यू !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह अन्य व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील काही दिवसात याच वाघांचा मृत्यूचे प्रमाण लक्षवेधी ठरते आहे. मागील 15 दिवसांचा जर विचार केला तर विदर्भात 6 वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला.

    दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला. तर भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली. तर एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला. तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला. तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पट्टेदार मृतदेह आढळला होता. त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्यात देखील एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला असून वन विभागाकडून या वाघाचा मृत्यू नैसर्गीक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र विदर्भात मागील पंधरा दिवसांमध्ये 5 वाघांचा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

    भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रात 29 डिसेंबरला वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. तर, 11 हजार केव्ही विद्युत तारांवर आकोडा टाकून वाघिणीची शिकार केल्याचा प्रकार तुमसर वनपरिक्षेत्रातील झंजेरिया जंगलात 6 जानेवारीला उघडकीस आली होती. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात 8 जानेवारी 2025 ला वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती.

    सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावाजवळील जंगलात वृद्धापकाळाने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना 2 जानेवारीला उघडकीस आली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी शेतशिवारातील नाल्याजवळ घडली होती. यवतमाळच्या वणी परिसरातील उकनी कोळसा खाणीच्या परिसरात तीन ते चार वर्षाचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघाचा मृत्यू विजेच्या जिवंत तारेच्या स्पर्शाने झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील भानपुर गावाजवळ पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला. या वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

    Tiger
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif