मध्यरेल्वेचा तीन दिवस मेगा ब्लॉक; भुसावळ विभागातील 10 रेल्वेगाड्या रद्द

0

जळगाव : मुंबईत मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला असल्‍यने शंभरपेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस आणि (Railway) मालगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ (Bhusawal) विभागातील दहा गाड्यांचा समावेश आहे. (jalgaon news Three day mega block of Central Railway 10 trains canceled)

कोकणात जाणाऱ्या गाड्याही रद्द-
72 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकचे कारण म्हणजे ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान पाचव्या लाइनवर आणि दिवा ते ठाणे या स्थानकादरम्यान सहाव्या लाइनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे कोकणात (Kokan) जाणाऱ्या काही गाड्याही या तीन दिवसांत रद्द करण्यात आल्या आहेत.

भुसावळ विभागाच्या गाड्या रद्द-

शुक्रवार (ता.4) आणि शनिवारी (ता. 5)
१२११२ अमरावती – मुंबई (Mumbai) मेल एक्स्प्रेस,
१२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम मेल एक्स्प्रेस
१७६११ नांदेड – मुंबई राज्यराणी मेल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तर शनिवारी (ता. 5) आणि रविवारी (ता. 6)
१२०७१ मुंबई-जालना मेल एक्स्प्रेस,
१२०७२ जालना-मुंबई मेल एक्स्प्रेस,
१२१०९ मुंबई – मनमाड मेल एक्स्प्रेस,
१२११० मनमाड – मुंबई मेल एक्स्प्रेस,
१२१११ मुंबई – अमरावती मेल एक्स्प्रेस,
१२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम मेल एक्स्प्रेस,
१७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी मेल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.