Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»केंद्र सरकारकडून 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील
    लोकार्थ

    केंद्र सरकारकडून 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील

    नितीन गडकरींची घोषणा : सरकारचा मोठा निर्णय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 14, 2026No Comments287 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. याचा फटका भारतात बसत आहे. अमेरिका आणि इराण युद्धात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. चाैथ्यांना सरकारने किमती वाढवल्या. केंद्र सरकारकडून या परिस्थितीमधून मार्ग काढण्याकरिता मोठे निर्णय घेतले जात आहेत.

    सरकारने अधिक इथेनॉलचे प्रमाण असलेल्या पेट्रोलवर उत्पादन शुल्कात मोठी सलवत जाहीर केली होती. अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, 22% ते 30% दरम्यान इथेनॉल असलेल्या पेट्रोलवर कोणतेही उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.

    फ्लेक्स फ्यूल तंत्रज्ञान असलेल्या वाहनांना आता E100 म्हणजेच 100% इथेनॉल इंधन वापरण्याची परवानगी देण्यात आलीये. नितिन गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पाशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे देशात शुद्ध इथेनॉल इंधनाच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे. इथेनॉलबाबत सरकार मोठे निर्णय घेताना दिसत आहे.

    भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नियोजित वेळेआधीच साध्य केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीमधून मार्ग काढण्यासाठी अशाप्रकारचे निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत. ज्यामुळे कच्च्या तेल आयातीवर खर्च कमी होईल आणि देशाची 1 लाख करोड रूपयांपेक्षाही अधिकची बचत होईल. या यशानंतर सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलत 100 टक्के इॅथेनाल बेस्ट सिस्टमकडे वाटचाल केली.

    नितिन गडकरी यांनी यावर बोलताना म्हटले की, हे सांगताना आनंद होत आहे की, उद्या रात्रीपासून 100 टक्के इथेनॉल कायदेशीर वापरास मंजुरी देणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. इथेनॉल प्रकल्प रोखण्यासाठी नकारात्मक प्रचारही करण्यात आला होता. पण आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे, असेही नितिन गडकरी यांनी म्हटले. नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता या फाईलवर सही केली. उद्या रात्रीपासून हे लागू होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026

    संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif