मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. दिल्ली दारू धोरणात भ्रष्टाचार झाल्याच्या केंद्राच्या आरोपांवरून आम आदमी पार्टी (आप) सरकारने ठामपणे नकार दिला आहे.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांचा अशा प्रकारे छळ केला जातो आहे. पुढे त्यांनी म्हटले की, सीबीआय चे येणं हे स्वागतार्ह आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळेच आपला देश अजून नंबर.1 बनलेला नाहीये.

सिसोदिया पुढे म्हणाले की, हे लोक दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्याबाबत होत असलेल्या उत्कृष्ट कामावर नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली, जेणेकरून शिक्षण आरोग्याची चांगली कामे थांबवता येतील. सिसोदिया म्हणाले की, आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत आणि न्यायालयात सत्य बाहेर येईल.

देशातील चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही,
सिसोदिया म्हणाले की, आम्ही सीबीआयचे मी स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करू जेणे करून सत्य लवकरच बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस झाल्या पण काहीही बाहेर आलेले नाही. आणि यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही, देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही.

दिल्लीतील चांगली कामे आम्ही थांबू देणार नाही, असे सीएम केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. सिसोदिया यांच्याप्रमाणेच केजरीवाल यांनीही सीबीआयचे स्वागत, असल्याचे सांगितले. आमचे पूर्ण सहकार्य असेल. यापूर्वीही अनेक तपास आणि छापे टाकण्यात आले मात्र काहीही निष्पन्न झालेले नाही. आणि आजही काही निष्पन्न होणार नाही. ज्या दिवशी अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर दिल्ली शैक्षणिक मॉडेल आणि पेपरमध्ये मनीष सिसोदिया यांचा फोटो छापला गेला, त्याच दिवशी मनीष यांच्या घरी केंद्राने सीबीआयला पाठवली.

सीबीआयच्या कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलवर सतत चर्चा करत आहे. आणि केंद्र सरकारला हेच थांबवायचे आहे. त्यामुळे दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांवर छापे टाकून त्यांना अटक करण्यात येत आहे. 75 वर्षात ज्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला त्याला रोखले गेले आहे त्यामुळे भारत मागे राहिला.

Leave A Reply

Your email address will not be published.