Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग..
    राजकारण

    वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग..

    तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 13, 2026No Comments312 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    लाडीक बहीण योजनेबद्दल मोठी अपड़ेट समोर आली आहे. या योजनेतून अनेक महिलांची नाव वगळण्यात आली आहेत मात्र आता थोड्याथोडक्याा  नव्हे तर तब्बल 92 लाख बहिणींचा हप्ता बंद होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर लाभार्थी यादीतून तब्बल 92 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली आहेत.

    यामुळे मोठी खळबळ माजली असून लाडक्या बहिणींसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र याच मुद्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलं असून अनेकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, रोहिणी खडसे यांनी तर ट्विट करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला सुनावलं आहे.

    तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का? वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीचं नको झाल्यात का? असा डायकरेक्ट सवालच खडसे यांनी विचारला आहे. X वर एक मोठी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे.

    रोहिणी खडसे यांची पोस्ट..

    काही महिन्यांपूर्वी ८० लाख पेक्षा अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं आहे.
    सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८ कोटींवरून ३३ हजार ६९७ कोटींवर गेला आहे. लाडक्या बहिणींवर ७५०० कोटींचा खर्च वाढला आहे.
    काय ओ भाऊ राया, @CMOMaharashtra @mieknathshinde . आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय ? आता तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का ? वहिंनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?
    लाडक्या बहिणींचा खंबीर ‘दादा’ आता नाही पण किमान सुनेत्रा वहिनी तुम्ही तरी लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय मांडा !

    असं रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

    तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे. राजकीय हित साध्य झाले… आता लाडक्या बहिणींना विसरले! असं म्हणत वडेट्टीवार यांनीही X वर लाडकी बहीण संदर्भात ट्विट केलं आहे.

    विजय वडेट्टीवार यांची पोस्ट..

    निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणी म्हणून ज्या महिलांना डोक्यावर घेतले, त्याच महिलांना सत्ता मिळताच योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. तब्बल ९२ लाख महिलांना योजनेतूनi वगळण्याचा निर्णय हा महिलांच्या विश्वासघाताचा आणि राजकीय स्वार्थाचा कळस आहे.

    सत्ता मिळवण्यासाठी कोणतीही शहानिशा न करता सरसकट लाभ वाटण्यात आला, पण आता वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र ठरवले जात आहे. जर त्या महिला अपात्र होत्या, तर त्यांना आधी लाभ का देण्यात आला? आणि जर त्या पात्र होत्या, तर आता त्यांना वगळण्याचे कारण काय? या योजनेवर १४ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. या पैशांच्या नियोजनातील गोंधळ, चुकीचे निकष आणि राजकीय फायद्यासाठी केलेल्या निर्णयांचा हिशोब कोण देणार?

    महिलांच्या भावनांशी खेळ करून, त्यांच्या नावावर राजकारण करून आणि सत्ता मिळताच त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. लाडक्या बहिणींसाठी नव्हे, तर मतांसाठी योजना होती का? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे!, असं वडेट्टीवार यांनी लिहीलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif