Browsing Category

महाराष्ट्र

घरफोडीच्या गुन्हयातील फरार आरोपीला अटक

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित रवी प्रकाश चव्हाण (वय १९, रा. तांबापुरा) याच्या एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी शेरा चौकातून मुसक्या आवळल्या. यावल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात संशयित रेकॉर्डवरील…

मंदिरातील दानपेटी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव ;- तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील शाकांभरी देवी मंदिराचे कुलूप तोडून मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कन्नड तालुक्यातील सीतामाई तांडा येथील तरुणास हर्सल…

वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल…

धक्कादायक : पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला

पुणे: वडगाव शेरी परिसरातील मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाला आहे, असा बनाव मुलीने रचला होता. परंतु, मुंबई येथील एका नातेवाईकाने…

नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला पाठिंबा – राज ठाकरे

मुंबई: ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी राज यांच्या नेतृत्वासाठी राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

अरे वेड्या आम्ही सात वेळा एकाच जागी निवडून येतो !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत.…

‘श्रीरामां’मुळे राष्ट्रवादीत ‘असंतोष’ !

मन की बात (दीपक कुलकर्णी) आज ठरणार उद्या ठरणार असे करीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असला तरी यामुळे महाविकास आघाडीमध्येच बिघाडीची शक्यता अधिकतेने निर्माण झालेली आहे. आज माध्यमांसमोर आलेल्या…

नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ…

ब्रेकिंग ! रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7…

रावेर लोकसभा उमेदवारी राष्ट्रवादीकडूनही दे धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभेसाठी उमेदवारीच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जळगाव प्रमाणेच सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काही दिवसांपूर्वी…

गुढी पाडव्याच्या दिवशी आसोद्यात खून

जळगाव ;- शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मंगळवारी सकाळच्या सुमारास मारहाणीत मृत्यू झाला आहे. दरम्यान, चोरीच्या संशयावरून त्याला परिसरातील चौघांनी असोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या…

सावदा येथे आगीत दोन दुकान जळून खाक

सावदा ;- सावदा येथे बस स्टॅन्ड जवळील असलेल्या दोन दुकानांना दि 8 रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान अचानक आग लागली यामुळे दुकानातील साहित्य जाळून खाक झाली. एका गैरेंज मध्ये दुकान बंद असतांना अचानक आग लागली तेथून धुराचे लोट दिसू लागतात…

रस्त्यात अडवून तरुणाला लुटणारी ‘चौकडी’ जेरबंद

जळगाव :- तरुणाला चौघांनी रस्त्यात थांबवून त्याच्या हातातील चांदीचे ब्रासलेट, मोबाईल व रोकड जबरीने चोरुन नेल्याची घटना जे. के पार्क परिसरात घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी चौघ संशयितां केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : -शेतात ट्रॅक्टर चालवून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या हर्षल विश्वनाथ चौधरी (वय २३, रा. गढोदा, ता. जळगाव) या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.…

जलतरण तलावात पोहताना १७ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू

चाळीसगाव :- पोहण्यासाठी आलेल्या एका १७ वर्षीय तरूणाचा पोहत असताना अचानपणे मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील चिंचखेडे येथील अमन मनोहर निकम (वय १७) हा तरूण शहरातील शासकीय आयटीआयमध्ये…

शिरसोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव : सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेत ज्ञानेश्वर तुकाराम खलसे (बारी) (वय ५५, रा. बारीनगर, शिरसोली प्रबो, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी…

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; ८ जण ताब्यात

वरणगाव : - वरणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील एका वाड्यात सुरु असलेल्या जुगार अड्डूयावर धाड टाकली. याठिकाणाहून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून…

पैसे नसल्याने उपचाराअभावी मुलीच्या मृत्यूची खंत ; बापाने गळफास घेऊन संपविले जीवन

सोयगाव ;- कुठलेही कारण न देता मुख्याधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्‍यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला आपल्या आजारी लेकीवर आवश्यक उपचारही करता आले नाही. उपचाराअभावी १९ वर्षीय तरुणीचा…

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी, सामान्य निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक निश्चित

जळगावसाठी राहुल गुप्ता, रावेरसाठी अशोककुमार मीना तर जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून प्रियंका मीना जळगाव;- गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून…

फॅक्टरीच्या मालकानेच केला चोरीचा बनाव ; मालकासह दोन जण ताब्यात

जळगाव ;- वेफर्स फॅक्ट्रीत चोरी झाल्याची खोटी तक्रार देऊन विमा कंपनीचे पैसे परत मिळावेत यासाठी बनाव करणाऱ्या मालकाचा पर्दाफाश जळगाव जिल्हा पोलिसांनी केला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस…

नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन मित्राने केला तरुणीचा खून

पुणे : - एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने नऊ लाख रुपयांच्या खंडणीसाठी साथीदारांच्या मदतीने आपल्याच मैत्रिणीचे विमाननगर येथील फिनिक्स मॉलजवळून अपहरण केले. त्यानंतर तिचा चारचाकी गाडीतच खून करून पुणे-अहमदनगर महामार्गावरील कामरगावच्या…

उद्योजक श्रीराम पाटील भाजपमधून राष्ट्रवादीत ; रावेर लोकसभा मतदार संघातून मिळाली उमेदवारी

जळगाव;- - रावेर येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे पदाधिकारी श्रीराम पाटील यांच्या नावाची रावेर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत घोषणा केली. श्रीराम पाटील यांनी…

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

मुंबई ;- महाविकास आघाडीचा राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद…

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण शेतकरी ठार ; पाचोरा तालुक्यातील दुर्दैवी घटना

पाचोरा ;- जळगांव ते पाचोरा महामार्गावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने खेडगाव (नंदिचे) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. संबंधित शेतकरी हे हायवे क्रास करत असतांना ट्रॅक्टरने धडक…

देवझाड वनपरिसरात अवैध हातभट्टी दारू उद्धवस्थ ; यावल वनविभागाची कारवाई

यावल ;- चोपडा तालुक्यातील वैजापूर वनक्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीचे दारु अड्डे यावल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. याठिकाणाहून सुमारे अडीच लाख किमतीची अडीच हजार लिटर हातभट्टीची दारू सात हजार रुपये किमतीचे ३५ बॅरल असा दोन लाख…

एकनाथराव खडसे यांच्यावरील एसआयटीच्या स्थगितीला आव्हान

छत्रपती संभाजीनगर ;- माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या जागेतून कोट्यवधींचा अवैध गौण खनिज उपसा केल्या प्रकरणात शासनाकडूनच एसआयटी स्थापन करण्यात आली होती. नंतर एसआयटी अहवालाला स्थगिती देण्यात आली असून, त्याला आव्हान देणारी…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

सेंट्रींग काम करतांना विजेचा धक्का लागल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल तालुक्यात १९ वर्षीय मजूर युवकाचा खेडगाव तांडा येथे घराचे सेंट्रींग काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समाधान साहेबराव महाजन (19) असे मयताचे नाव…

आता महारष्ट्रातील या बँकेतून ग्राहक पैसे काढू शकणार नाहीत; आरबीआयने लादले निर्बंध…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर अंकुश लावला. सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही…

संजय राऊतांनी नौटंकी थांबवा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे मत विचारात न घेता ठाकरे गटाने थेट या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केल्याने दोन्ही गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.…

तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला !

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  ‘‘खरे शिवसैनिक कोण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे, उगाच सांगता आमचा पक्ष चोरला अमुक केले तमुक केले. उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला,’’ अशी खोचक टीका…

कितीही धमक्या द्या, धमक्यांना भीक घालणार नाही !

बारामती, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता कोणी फोन करतो, कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे…

मंत्री महाजनांच्या आदेशाला सहसंचालकांचा ठेंगा!

ठेका रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन : रुग्णवाहिका चालकांचा इशारा जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करुन कारवार्इ करावी अशी सूचना…

हक्काच्या जागा सोडू नका, शिवसेना आमदारांचा नाराजीचा सूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत अनेक मंत्री आणि आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. ‘राज्यातील शिवसेनेच्या…

स्व. जितेंद्रलाल जयस्वाल यांच्या स्मरणार्थ मोफत पाणी टँकर सेवा

निजामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  निजामपूर येथील स्व. जितेंद्रलाल गणेशलाल जयस्वाल यांच्या स्मरणार्थ भिकनलाल  गणेशलाल जयस्वाल व भटुलाल गणेशलाल जयस्वाल यांच्याकडून मोफत पाणी पुरवठा टँकरची सेवा सुरू करण्यात आली आहे. परिसरात पाहिजे त्याला…

महाजनांना जागा दाखवण्यासाठीच शिवसेनेचा उमेदवार !

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गिरीश महाजन हेच मुंगेरीलाल आहेत, त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी,…

मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर!

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव ;- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण…

तावडेंचा पुढाकार.. वाघांना उमेदवारी अन्‌ खडसेंची घरवापशी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रोज नवनवे किस्से समोर येत आहेत. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या घरवापशीची जोरदार चर्चा होत असून लवकरच ते अधिकृत प्रवेश देखील घेणार आहेत. एकनाथ खडसे आणि देवेंद्र…

हुश्श : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला ; उद्या होणार नावांची घोषणा

मुंबई ;-लोकसभा निवडणूक जुळवलं येऊन ठेपलेली असताना जागा वाटपाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या काही नावाची घोषणा उद्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार असून संयुक्तरिया परिषद घेऊन जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे.…

निजामपूर येथे हिंगलाज माता प्रकट दिन उत्साहात

निजामपूर - साक्री तालुक्यातील निजामपूर येथील भावसार समाज व अर्गनाइजेशन आफ सोशल सर्वीस संयुक्त विद्यमाने हिंगलाज माता प्रकट दिन साजरा करण्यात आला. हिंगलाज माता प्रकट दिना निमित्त निजामपूर येथिल त्रिमूर्ती चौकात हिंगलाज माता प्रकट दिना…

निजामपूर येथे टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा

हेमंत महाले साक्री ;-तालुक्यातील निजामपूर येथे स्व. जितेंद्रलाल गणेशलाल जयस्वाल यांच्या स्मरणार्थ गावात मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यात आल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे. सध्या निजामपूर येथे पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना…

कासमवाडी परिसरातून १५ बकऱ्या चोरी करणारा जेरबंद

जळगाव ;-कासमवाडी परिसरात बकर्या चोरून त्या रिक्षाने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एकासह चोरीत वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून याबाबत एमआयडीसी पिलास स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची…

मतदार राजा जागा हो ! ; चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन

चाळीसगाव: ;- तहसील कचेरी निवडणूक शाखा चाळीसगाव व स्विप कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती (शिक्षण विभाग )चाळीसगाव तर्फे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविणे व जनजागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश असून, ज्या गावात २०१९ च्या…

गुढी पाडव्याला सोने चांदी खरेदीचा विचार करताय ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई ;- उद्या गुढी पाढव्याचा सण असल्याने यादिवशी सोने चांदी खरेदीला नागरिकांची पसंती असते . गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सोने चांदी खरेदीला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. आज गुढी…

एकनाथ खडसेंनी शरद पवारांना दिला दगा !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करणार असून हा शरद पवार यांच्याशी दगाफटका असून खडसे मंत्री गिरीश महाजन यांनाही शह देण्याच्या तयारीत असल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि…

राजकीय अनास्थेची उंच ‘पताका’ अन्‌ विकासाची ‘गुढी’ अधांतरी !

चिनावल (दिलीप भारंबे), लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दरदिवसाला नव्या राजकीय समीकरणांमुळे वातावरण ढवळून निघत असून आयाराम-गयाराम संस्कृतीमुळे राजकारणाची उलथापालथ होत असली तरी विकासाचा मुद्दा मात्र पिछाडीवर पडलेला…

खासदार उन्मेश पाटील यांनी शहरात घेतल्या मॅरेथॉन बैठका…l

चाळीसगाव -- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये करणदादा पाटील यांच्या उमेदवारीने नवचैतन्य संचारले आहे. करण पाटील निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून करण पाटील यांचा विजय…

मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकणारे ठाणांग सूत्र ‘आगम वाचना’ – प. पू. विजय…

सेवार्थी भवरलालजी आणि कांताई जैन परिवाराचा हृदय सत्कार; आगम वाचना शिबीराचा समारोप जळगाव;- मनुष्य जीवनातील अंधार दूर करण्याची ताकद ही ज्ञानात आहे. हे ज्ञान म्हणजे दुसऱ्यांविषयी कल्याण भावना श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे हवे.…

ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला साडेबारा लाखांचा गंडा

जळगाव :- ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवित खासगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सायबर चोरट्यांनी १२ लाख ६७ हजारामध्ये फसवणुक केली. ही घटना उघउकीस आल्यानंतर ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. शहरातील योगेश वसंत हेबाळकर…

जळगावात चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार

जळगाव :- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत राहुल ताराचंद गुरव याने पत्नी ममता गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ…

नर्सिंगच्या विद्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव :रुममध्ये एकटीच असलेल्या शासकीय परिचारिका चे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षात असलेल्या करुणा संतोष बोदडे (वय २२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) या विद्यार्थीनीने मैत्रीणी गावाकडे गेलेल्या असल्याने गळफास…

दिव्यांग तरुणाची रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या

जळगाव :- कामानिमित्त बाहेर जातो सांगत घरातून बाहेर पडलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला . यापरप्रकणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. भगवान मणिलाल चौधरी (वय…

भोईटे नगरात वृद्धाच्या घरातून चांदीचे भांडे चोरले

जळगाव : शहरातील भोईटे नगरात ६५ वर्षीय वृध्दाचे बंद घर फोडून ६ हजार ५५० रूपये किंमतीचे चांदीचे भांडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

या नाथाभाऊ….या !

मन की बात (दीपक कुलकर्णी) उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे अर्थात नाथाभाऊ पुन्हा आपल्या मुळ पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याने भाजपमध्येही ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे वातावरण निर्माण झाले आहे. चैत्र शुद्ध पाडव्याच्या…

सहसंचालकांची चुप्पी रुग्णवाहिका चालकांच्या मुळावर !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबई येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीला राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. रुग्णवाहिका चालकांनी गेल्या दोन…

जागतिक आरोग्य दिनानिमित्त महत्व आणि उपाय

जळगाव ;- जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे".…

निजामपूरचा पाणी प्रश्न गंभीर, सर्वांचे हात कानावर

निजामपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क  सरवड- ब्राम्हणवेल हायवेच्या कामात निजामपूर गावात मुख्य जलवाहिनी तुटली. लगतच्या नागरिकांसाठी दीड महिन्यापासून गंभीर पाणी संकट उभे राहिलेले आहे. अखेर ग्रा. पा. ने समस्या निवारणासाठी लक्ष घातले. नळाद्वारे…

धुळे लोकसभा : भामरेंची हॅटट्रिक होईल का?

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपने गेल्या तीन निवडणुकीत मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळालेला मतदारसंघ म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ. भाजपने मतदारसंघात सलग दोन वेळा खासदार बनलेले डॉ. सुभाष…

जळगावात 2191 कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी यांच्या मतदान विषयक प्रथम प्रशिक्षणाचे शनिवार…

ब्रेकिंग ! अखेर खडसेंची घरवापसी, आज ठरणार मुहूर्त ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच एकनाथ खडसे यांनी नुकतीच दिल्लीचा दौरा करून  केंद्रीय स्तरावरील भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्याची…

जळगावात भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम

जळगाव ;- भाजपचा ४४ वा वर्धापन दिनामित्त जी.एम.फाउंडेशन व “वसंत स्मृती” कार्यालय,या ठिकाणी वयोवृध्द कार्यकर्ते नारायण चौधरी (वय ९४) यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, आ.चंदू पटेल,…

भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवारांच्या संपर्कात?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी नव्या उमेदवाराचा शोध घेत असून भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवार यांच्या संपर्कात असून उमेदवारी मिळविण्यासाठी या युवा नेत्याची धडपड सुरु झाली आहे. शरद…

‘ए.टीं’ना उमेदवारी द्याना… अनेकांची ‘ना…ना’!

मन की बात (दीपक कुलकर्णी) अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजला अन्‌ अनेकांना खासदार होण्याचे स्वप्न पडू लागले. प्रत्येक पक्षात आयाराम-गयाराम यांची संख्या लक्षणियरित्या वाढली अन्‌ पक्ष श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला. जळगाव व रावेर…

वाघूर धरणात दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा

जळगाव : यावर्षी वाघूर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे वाघुर धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे वाघुर धरणात ७३ टक्के जलसाठा शिल्लक असून जळगाव शहराला दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा धरणात आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या तरी पाणी टंचाईची चिंता नसली…

बळीराम पेठ  येथे पाडवा ते रामनवमी राम कथासार व प्रवचन

श्री साई सेवा मंडळचा उपक्रम जळगाव ;- धुळे येथील निलाताई रानडे यांच्या अमोघ वाणीतून पाडवा ते रामनवमी हा प्रवचनाचा कार्यक्रम दिनांक : ९ एप्रिल २०२४ ते १७ एप्रिल २०२४ या दरम्यान श्री साई सेवा मंडळ, बळीराम पेठ, जळगांव तर्फे आयोजित करण्यात…

जीपीएस ग्रुप यांच्या पुढाकाराने पक्षी प्रेमींना 500 बडगे (मातीची भांडी) वाटप

पाळधी/ धरणगाव ;- पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद…

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांची परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुक्रवार दि. ५ एप्रिल पासुन सुरळीत सुरु झाल्या. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी पहिल्या दिवशी जळगाव शहरातील तीन महाविद्यालयांमधील…

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीस फूस लावून पळविले

यावल : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमीष दाखवत अपहरण केले. हा प्रकार २७ मार्चला रात्री ८ वाजेला उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अनैतिक संबंधातून महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क  मुक्ताईनगर येथील महालखेडा शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेच्या डोक्यात दगड टाकून, शरिरावर गळ्यावर धारदार हत्याराने वार करून निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना…

इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर मीडिया कक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची करडी नजर

इलेक्ट्रॉनिक,सोशल मीडियावरून प्रचार करायचा असेल तर जाहिरात प्रमाणित करून घेणे अनिवार्य जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व रावेर मतदार संघासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली एमसीएमसी समितीची स्थापना झालेली आहे.…