Browsing Category

गुन्हे वार्ता

जळगावात बंद घर फोडले ; ५८ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव ;-  बंद घर फोडून ५८ हजार ३७५ रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे व रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी शहरातील जुना खेडी रोडवरील गिताई नगर येथ सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात…

पैसे मागितल्याचा रागातून महिलेच्या डोक्यात सळई मारून केले जखमी

जळगाव : घर खर्चासाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करीत लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील गुरुनानक नगरात घडली. याप्रकरणी संशयित पतीसह सासूविरुद्ध शनिपेठ…

कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका

पारोळा -पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर शुक्रवारी पहाटे मालेगाव येथे कत्तलीसाठी अवैधरित्या गायींची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास तब्बत १२ गायींची सुखरूप…

जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात ; दहा जवान गंभीर

गडचिरोली : - छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण 40 जवान होते. यापैकी दहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यातील तीन…

तरुणाचा मोबाईल धूम स्टाईलने लांबविला ; एकाला अटक

धरणगाव ;- महाविद्यालयीन शिक्षण घेणारा तरूण हा रस्त्याने मित्रासोबत पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी तरूणाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २०…

पिंपळगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल पवार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव

पाचोरा ;- तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले शिस्तप्रिय पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल पवार यांना पॉस्को गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गौरव करण्यात…

बोदवड तालुक्यात १३ वर्षीय मुलावर अत्याचार

बोदवड;-  तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलाला एका निर्जन स्थळी नेवून त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

बंद कंपनीचा दरवाजा तोडून लांबवल्या इलेक्ट्रीक मोटार

जळगाव :- शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील ई सेक्टरमधील बंद असलेल्या गुरूकृपा इंडस्ट्रिज या कंपनीचा लोखंडी दरवाजा तोडून ६४ हजार २४२ रुपये किंमतीच्या इलेक्ट्रीक मोटर चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना बुधवार दि. १७ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस…

पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मालवाहू रिक्षाच्या धडकेत मृत्यू

जळगाव : - रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्याला भरधाव मालवाहतुक करणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याची घटना दि. २९ मार्च रोजी स्मशानभूमीरोड परिसरात घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र लक्ष्मी नारायण ओझा (वय ५४, रा. जिल्हापेठ) यांचा…

पैसे मागितल्याचा राग आल्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव : पैसे न दिल्याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करीत सूर्यभान हिंमत पाटील (वय ३९, रा. कुसुंबा) यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना दि. १९ एप्रिल दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुसुंबा गावातील हॉटेल सरकार समोर घडली. याप्रकरणी…

रिक्षा पलटी झाल्याने प्रौढाचा मृत्यू

जळगाव : लग्नाच्या कार्यक्रमासाठी रिक्षाने जात असतसांना अचानक चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा उलटली. या अपघातात भिवसन खंडू कोळी (वय ५०, रा. पाळधी, ता. धरणगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना घटना शनिवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या…

जळगावातील आरसी बाफना शोरुममध्ये आयटी विभागाची धडक !

जळगाव ;- देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा या शोरुममध्ये शनिवारी सायंकाळी आयकर विभागाच्या पथकाने धडक दिली. आयकर पथकाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करीत होते. शोरुममध्ये…

बदल्यांच्या खेळात ठेका रद्द करण्याचा खेळखंडोबा!

रुग्णवाहिका चालक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला असतांना हा…

आव्हाने रस्त्यावर शेतात एकाचा खून; खुनाच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव शहरात गुन्हेगारांना जणू कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही भय राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच असोदा शिवारात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव…

महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा

जळगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी १८ एप्रिल रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील  गावात…

मोर नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

यावल : अवैधरित्या तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर सहा. पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यांनी नदीपात्रात धडक कारवाई करीत तेथून जेसीबी, डंपरसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात…

गावठी दारू अड्ड्यावर धाड

पाळधी, ता. धरणगाव :  टाकरखेडा शिवारात खेडी-कढोली रस्त्यावर टेकडीच्या आडोशाला गावठी दारू तयार होत असल्याची माहिती येथील पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाड टाकून दोन महिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात रवींद्र इंगळे…

पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

नवी दिल्ली ;- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील ५ जागांसह देशभरातील २१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. यात दाक्षिणात्य राज्य तामिळनाडूतील सर्व ३९ जागा व राज्यातील…

लोकसभेसाठी अर्ज घेण्यास प्रारंभ ; रावेर,जळगाव मतदारसंघासाठी २६जणांनी घेतले ७३ अर्ज

जळगाव : - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ व रावेर लोकसभा मतदार संघातील खासदारकीसाठी आजपासून (दि.१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून स्वतंत्र कक्ष…

चाळीसगावातून तीन गुन्हेगार हद्दपार

चाळीसगाव ;- आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिनही सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगाव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी केले…

एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

जळगाव :- एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसीतील रेमंड…

तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव;- नाश्त्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रुपेश प्रभाकर माळी वय-19 रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक…

मोरया कंपनीच्या मालक, व्यवस्थापनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा

जळगाव ;- एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार होण्यासह २२ जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा स्फोट बुधवार, १७ एप्रिल रोजी…

प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयिताला अटक

अमळनेर - : शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालून त्यांच्या…

रनाळे येथे महिलेचा निर्घृण खून

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे किरकोळ कारणावरुन निराधार महिलेचा खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयीत युवकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव सोनवणे असे आरोपीचे नाव असून, त्यास २२ एप्रिल पर्यंत…

दुचाकी अपघातात माजी मुख्याध्यापकाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल ;- भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील माजी मुख्याध्यापक के.ए.तायडे यांचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक…

जळगावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

जळगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी तालुका पोलीस…

जामनेर तालुक्यात १६ शेळयांचा होरपळून मृत्यू

फत्तेपूर, ता. जामनेर ;- येथून जवळच असलेल्या राज्य मार्ग क्रमांक ४४वरील पिंपळगाव पिंप्री येथे १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या - आगीत ७ घरे जळून खाक झाली. तसेच गोठ्यात बांधलेल्या १६ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर…

सांगलीमध्ये भीषण अपघातात सात ठार

सांगली: - भरधाव कुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.…

कर्जाला कंटाळून चोरवडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा : - काहीतरी विषारी द्रव्य प्राषण करून तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी राजेंद्र गजमल पाटील यांनी १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.…

नाचताना धक्का लागल्याने तरुणाला फायटरने मारहाण

जळगाव -: मिरवणुकीत नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणासोबत वाद घालीत त्याला शिवीगाळ करीत फायटरने मारहाण केली. ही घटना दि. १४ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दरम्यान रात्री अकरा वाजता शहरातील जय…

भुसावळात ४१ हजारांचे दागिने लंपास ; गुन्हा दाखल

भुसावळ ;- शहरातील भीमा कॉलनीत भरदिवसा घरातून ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…

भुसावळात बंद घर फोडले ; २८ हजारांचा मुद्देमाल चोरला

भुसावळ ;-महिलेचे बंद घर फोडून लोखंडी कपाटातून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शहरातील तुकाराम नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर…

श्रीराम पाटलांनी नेते, पदाधिकाऱ्यांना वगळले?

जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे फोटो गायब : कार्यकर्ते नाराज जळगाव ;- रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. श्रीराम पाटील प्रचाराला लागले असून मेळावा…

मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त, आपण दणदणाट निधी आणतो – आमदार मंगेश चव्हाणांचे विधान

जळगाव ;- मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त आहे, त्यामुळे आपण दणदणाट निधी आणतो आणि पैसे वाटतो असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांना…

एमआयडिसीतील केमिकल कंपनीला भीषण आग ; १५ कर्मचारी जखमी

जळगाव : - जळगाव एमआयडीसी परिसरातील डब्ल्यू सेक्क्टर मधील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.असून आगीत १५ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावरखासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली…

शरद पवार २०,२१ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव ;- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या…

आ. एकनाथराव खडसे यांना धमकी ; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर;- आ. : एकनाथराव खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले. तसेच, विविध देशातून फोन येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन…

गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे पोहोचले सलमान खानच्या घरी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराने चाहत्यांना हादरवून सोडले. आता याप्रकरणी वेगाने कारवाई सुरू आहे. नुकतेच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची चौकशी सुरू…

धक्कादायक : मुलगीच झाल्याने चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या केली!

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे : मुलगा हा वंशाचा दिवा असे मानले जात असले तरी मुलगी ही वंशाची पणती असे म्हटले जाते. मात्र तरीही अनेक ठिकाणी मुलींचे पालनपोषण करणे कठीण होत असल्याने मुली नकोशा वाटतात. कधी गर्भपात तर कधी नवजात असताना मुलींना…

तापी नदीत जीवलग सवंगड्यांचा बुडून अंत

जळगाव नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्रथमेश आणि रोहन अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. तापी नदीत अंघोळीला गेले असताना दोघे जीवलग मित्र पाय…

पाचोऱ्यात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातुन अवैधरित्या दारुच्या बाटल्या मोटरसायकल वरुन घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाई मुळे अवैधरित्या चोरून दारुची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले…

जळगावात ठाकरे गटाला भगदाड !

पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचाही समावेश जळगाव ;- लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून कार्यकर्ते व…

चौघांकडून शेतकऱ्याला मारहाण ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर ;- काहीही कारण नसताना एका शेतकऱ्याला चौघांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील चोपडाई शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात…

फुले मार्केटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; महिलांची पोत ,रोकड लांबविली

जळगाव :- सोन्याची पोत दुरुस्तीसाठी आलेली महिला शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ब्लेडने बॅग कापून पर्ससह एक लाखाहून अधिक किमतीची सोन्याची पोत लांबविली. तर दुसऱ्या घटनेत महिलेच्या पिशवीत असलेली तीस…

अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

नशिराबाद ;- तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये मडिया भाऊसिंग भीलाला (वय २४, रा. मलगाव ता. झिरणीया म.प्र.ह.मु. भुसावळ) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. १३ रोजी सकाळी साडेदहा वाजता नशिराबाद…

मेळाव्यात भांडण सोडविल्याचा राग ; मारहाण करीत तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : - येथे आयोजित मेळाव्यात भांडण सोडविल्याच राग आल्याने एका टोळक्याने अब्दुल हनीफ पटेल (वय ३१, रा. रजा कॉलनी, शेरा चौक) या तरुणाच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात येऊनत्याच्या घरातील साहित्याची तोडफोड करीत त्यांच्या घरावर दगडफेक…

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई ;-  अभिनेता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहितीनुसार, दोन अज्ञात दुचाकीवरून सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले होते. तेव्हा त्यांनी तिथे ३-४ राऊंड फायर…

दुचाकी चोरट्याला अटक ; तीन दुचाकी हस्तगत

जळगाव-;- दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील रिधूर गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आकाश…

पुण्य कमावून स्वर्ग प्राप्तीचे आमिष दाखवीत वृद्ध डॉक्टरला साडेपाच कोटींचा गंडा

पुणे :- व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला वेळोवेळी गोड बोलून धार्मिक गोष्टी सांगून प्रभावित करण्यात आले. त्यांना पुण्य कमावून स्वर्ग मिळवण्याचे आमिष दाखवीत वेगवेगळ्या मालमत्तांचे एकूण ११ बक्षीसपत्र करून घेण्यात आली. तसेच,…

विद्युत पंप सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

वरणगाव ;- शेतात काम करत असताना पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीतील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील बोहार्डी शिवारात घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस…

किनोद येथे विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू

जळगावः-  तालुक्यातील किनोद गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय बालिकेला कुलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली अक्षदा किशोर मोरे (वय-१२) असे मयत बालिकेचे नाव…

पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

जामनेर :- देऊळगाव गुजरी येथे खळबळजनक दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या आपसातील वादातून पतीने आपल्या पत्नीसह ११ महिन्यांच्या मुलीची हत्या केली व त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची…

इन्स्पेक्टरने पोलिस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडली; सुसाईड नोटही समोर आली…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये आज एका पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. इन्स्पेक्टर मनोज कुमार यांनी सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी…

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील परप्रांतीय दोघे ठार

भुसावळ ;- भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीने जात असलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात…

गळफास लावून विवाहितेची आत्महत्या, घातपाताचा नातेवाईकांचा संशय

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील बाळद येथे राहत्या घरात २२ वर्षीय विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विवाहितेचा घातपात झाला असल्याचा संशय विवाहितेच्या नातेवाईकांनी करत ग्रामीण रुग्णालय परिसरात एकच आक्रोश केला…

जळगाव जिल्ह्यातील ९८५ शस्त्रे पोलिसात जमा

जळगाव;- जिल्ह्यात एकूण १ हजार ३२३ परवानाधारक शस्त्र असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर आज पर्यंत ९८५ शस्त्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तर ११५ शस्त्रधारकांना सूट देण्यात…

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : - शहरातील जोशींपेठ परिसरात एका सुवर्ण कारागिराने गळफास घेतल्याची धक्कदायक घटना गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मलाई जगई चक्रवर्ती (वय ३१ रा. पतंग गल्ली, जोशीपेठ जळगाव असे…

ब्लाउज आणायला जाते सांगत विस वर्षीय तरुणी घरी परतलीच नाही; वडिलांची पोलिसात धाव…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील ग्राम देवधाबा येथून एक 20 वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. ब्लाउज घेऊन येते सानागत घरातून बाहेर पडली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, देवधाबा येथील…

iPhone वर Spyware हल्ल्याने हॅकिंगचा धोका; Apple चा भारतासह 92 देशांना इशारा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिग्गज टेक कंपनी ॲपलने भारतासह जगातील 92 देशांतील युजर्सना एका विशेष धोक्याचा इशारा दिला आहे. ॲपलने म्हटले आहे की भारतासह जगातील 91 देशांमधील वापरकर्त्यांना मर्सेनरी स्पायवेअर…

मौजमजेसाठी दुचाक्यांची चोरी ; दोघांना अटक ,दहा दुचाकी जप्त

जळगाव : - दारु पिण्यासह मौजमस्तीसाठी जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी केलेल्या दुचाकी देवून टाकणाऱ्या दिलीप रामदास राठोड (वय ३०), अनिल शालीकराम चंडील (वय ३०, रा. टिटवी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) दोघांच्या रामानंद नगर पोलिसांनी…

पाळधी शिवारात गावठी हातभट्ट्या उद्वस्थ पहूर पोलिसांची कारवाई

पहूर, ता.जामनेर ;- येथून जवळच असलेल्या पाळधी शिवारात पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की येथून जवळच असलेल्या पाळधी गाव…

तुकारामवाडीत हल्ला करणाऱ्या ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- जुन्या वादातून २०२२ मध्ये सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर शासकीय रुग्णालयाजवळ खुनी हल्ला झाला होता. त्यात सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला होता. तर अरुण गोसावी जखमी होता. आता दि. ६ एप्रिल २०२४ रोजी अरुण गोसावी याच्या घरावर रात्री…

लिफ्ट देणे पडले महागात ; दुचाकीस्वार शेतकऱ्याचे सव्वा लाख लुटले !

यावल ;- यावल तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्या जवळील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घेवुन पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेली माहीती अशी की, दहिगाव तालुका यावल…

दुकान व घर घेण्यासाठी विवाहितेचा १५ लाखांची छळ ; गुन्हा दाखल

पाचोरा ;- इलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये व नविन घर घेण्यासाठी १० लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी धुपे ता. चोपडा येथील माहेरवाशिणीचा पाचोरा येथील पांडव नगरी येथे पतीसह सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ सुरु होता.…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आढळला मृतदेह

जळगावः;- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा ग्राहक मंच परिसरात एका ईलेक्ट्रीक डीपीजवळ बुधवार १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा संशयास्पदरित्या जळलेल्या अवस्थेतीत कुजलेला मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच…

रेल्वेचा धक्का लागल्याने वरणगावातील तरुण ठार

वरणगाव ;- शहराच्या सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा रेल्वेगाडीचा जोरदार फटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि १० बुधवार रोजी सकाळच्या सुमारास घडली पंकज कडू (भगत ) माळी (३२ ) दि ९ मंगळवारच्या रात्री घरात…

अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

फैजपूर, ता. यावल : सावदा ते फैजपूर रस्त्यावर ९ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेदरम्यान एका हरणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झाले होते. मध्यरात्री फैजपूर येथील शेख फारुक शेख अब्दुला यांनी जखमी हरणाबाबत सपोनी नीलेश वाघ व वन विभागाचे वनपाल…

पिस्तुलाचा धाक दाखवून १२ लाखांची रोकड चोरणाऱ्या दोन संशयितांना अटक

भुसावळ;- पिस्तुलाचा धाक दाखवून १२ लाखांची रोकड लुटणार्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सागर बबन हुसळे (फेकरी,…

घरफोडीच्या गुन्हयातील फरार आरोपीला अटक

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित रवी प्रकाश चव्हाण (वय १९, रा. तांबापुरा) याच्या एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी शेरा चौकातून मुसक्या आवळल्या. यावल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात संशयित रेकॉर्डवरील…