६० वर्षीय वृद्धावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जवळ बोलवत ६० वर्षीय वृद्धाने मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय वृद्धाने डोळ्यात औषध टाकून दे म्हणून सदर पिडीतेला बोलवले व १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हेमराज चौधरी (६०) याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा नशिराबाद पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here