ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
केतकी चितळेला दिलासा मिळाला नसून न्यायलयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आता सात जूनपर्यंत केतकी चितळे हिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण केल्यासंदर्भात केतकी चितळे हिने पोस्ट केली होती. त्याच पोस्ट संदर्भात 2020 रोजी ॲट्रॉसिटी गुन्हा तिच्यावर दाखल झाला होता. याच गुन्ह्याबाबत रबाळे पोलिसांनी केतकी चितळे हिला अटक केली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर केतकी चितळेला रबाले पोलिसांनी ठाणे कोर्टात हजर केलं होतं. आज (24 मे) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयनंतर केतकी चितळे हीला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
केतकी चितळे हिने 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला होता. इतकंच काय तर केतकीनं पोस्टमध्ये आक्षेपार्ह मुद्दे लिहिले होते. ‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क’, आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी ! ? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो”. अशी पोस्ट केतकीने केलेली होती. याच प्रकरणात तिच्यावर 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
राज्यभर गुन्हे दाखल
केतकी चितळे हिच्यावर राज्यभर गुन्हे दाखल आहेत. त्या बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी केतकीचे वकील योगेश देशपांडे करणार आहेत. आजच्या झालेल्या सुनावणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. तसेच रबाळे पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यात संदर्भात म्हणजेच ॲट्रॉसिटी बाबत जामीन अर्जही करण्यात आल्याची माहिती देशपांडे यांनी दिला. या जामीन अर्जावरील युक्तिवाद उद्या (25 मे) होणार आहे.