Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»मालवाहू गाडीची दुचाकीला धडक
    अपघात

    मालवाहू गाडीची दुचाकीला धडक

    बाजार समितीच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू 
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 7, 2026No Comments442 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा

    पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मालवाहू वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी देविदास प्रल्हाद नाईक ५३ यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

    याबाबत माहिती दिली अशी की बुधवार दिनांक ६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी देविदास प्रल्हाद नाईक (वय ५३) रा.गोपाल नगर पारोळा हे दिनांक ६ रोजी होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच १९ इ जे ५७४४ हिच्याने साई ट्रॅक्टर समोर पारोळा शहरातून जाणारा महामार्ग धुळे ते जळगाव रोडने धुळे कडून पारोळा शहरात येत असताना समोरून येणारी अशोक लिलँड कंपनीची मालवाहू गाडी क्रमांक एमएच १९ सी वाय ३२८९ ही पारोळा शहरातून धुळे कडे जात असताना तिच्यावरील चालकाने जबर धडक दिली.

    यावेळी झालेल्या अपघातात देविदास नाईक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते मयत झाल्याचे जाहीर केले. याबाबत नंदू जाधव यांनी फिर्याद दिल्यावरून मालवाहू चालक राजेंद्र बाबुराव शिंदे रा. आसोदा ता. जि. जळगाव यांच्या विरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहे. 

    देविदास प्रल्हाद नाईक हे पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा येथे क्लार्क म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांच्यावर मूळ गावी मालखेडा ता. जामनेर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif