Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    • बोदवडमध्ये गुंडगिरीविरोधात जनक्षोभाचा उद्रेक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कारमालकाचाच नातेवाईक निघाला चोर ; कारसह आरोपी जेरबंद 
    ताज्या बातम्या

    कारमालकाचाच नातेवाईक निघाला चोर ; कारसह आरोपी जेरबंद 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 26, 2025Updated:November 26, 2025No Comments50 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कारमालकाचाच नातेवाईक निघाला चोर ; कारसह आरोपी जेरबंद 

    एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
    जळगाव – घरासमोरून चोरीला गेलेली कार अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली आणि धक्कादायक म्हणजे ती चोरणारा व्यक्ती हा कारमालकाचाच नातेवाईक असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक करून कार ताब्यात घेतली आहे.

    रामेश्वर कॉलनीतील गणेश पांडुरंग जामोदे (वय ३७) यांच्या घरासमोर उभी असलेली कार २० नोव्हेंबर रोजी चोरीला गेली होती. प्रकरणाच्या तपासात एमआयडीसी पोलिसांनी संशयित विजय मनोहर जाधव (वय ३२, रा. नवनाथ नगर) याला अटक केली. चौकशीत त्याने चोरी केलेली कार छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना होऊन कार ताब्यात घेण्यात आली.

    चोर नातेवाईकच… आणि पूर्वीपासून ‘कार विकून टाका’ असा सल्ला देत होता!
    विजय जाधव हा जामोदे यांचा जवळचा नातेवाईक असून त्याचे घरात नेहमी येणे-जाणे होते. कार जुनी झाली असून ती विकून टाकावी, असा सल्ला तो नेहमी देत असे. मात्र प्रत्यक्षात त्यानेच कार चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

    कार छत्रपती संभाजीनगरमध्ये लावून ठेवली होती की विक्रीचा प्रयत्न केला होता, याचा पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपीकडून पुढील चौकशी केली जात आहे.

    ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली
    एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड पीएसआय राहुल तायडे, पीएसआय चंद्रकांत धनके, हेड कॉन्स्टेबल सफी पाटील, प्रदीप चौधरी, रमेश चौधरी, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, नितीन ठाकुर, किरण पाटील, शशिकांत मराठे, नरेंद्र मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif