Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»एमआयडीसी परिसरात कार्बन डायऑक्साइड गॅस गळती
    अपघात

    एमआयडीसी परिसरात कार्बन डायऑक्साइड गॅस गळती

    परिसरात भीतीचे वातावरण : कशी घडली नेमकी घटना?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 8, 2026No Comments137 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची घटना घडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका कार्गो कंपनीकडून उपकरणांमध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक ही दुर्घटना घडली.

    गॅस गळती होताच परिसरात मोठ्या प्रमाणात धुरासारखा पांढरा थर पसरला अन् विचित्र असा वास येऊ लागला होता. त्यामुळे काही वेळासाठी कर्मचाऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये भीती पसरली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

    अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित नियंत्रणाची उपाययोजना सुरू केली. काही वेळातच गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif