जळगाव :- शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील शिक्षकाची महागडी कार लांबवण्यात आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात आता दुचाकींपाठोपाठ चारचाकी लांबवल्या जावू लागल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. मनोज सुरेश भादुपोता (42) हे शिक्षक असून आपल्या परीवारासह कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात वास्तव्याला आहे. शिक्षकाची नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 15 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता त्यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची मालकीची कार (क्रमांक एम.एच.19 ए.ई.1727) पार्क केली असता चोरट्यांनी ही कार चोरून नेली. हा प्रकार शनिवार, 16 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता उघडकीला आला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनोज भादूपोता यांनी सर्वत्र कारचा शोध घेतला परंतू कार कुठेही मिळून आली नाही. अखेर दुपारी चार वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांनी तक्रार दिली. तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे.