Thursday, May 26, 2022

शिरपूरमध्ये 6,54,000 रुपयांचा गांजा जप्त

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

स्थानीक गुन्हे शाखा धुळे व थाळनेर पोलीस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील भोरखेडा शिवारातील कांजण्यापाडा येथील भोरखेडाकडे जाणाऱ्या कच्या रस्त्याजवळ बाजूला पडक्या झोपडीवर (दि.11 एप्रिल) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास धाड टाकली असता तेथून दोन गोण्यांमधे हिरवट रंगाचे फुल पाने, बिया, व देटसह ओलसर उग्र वासाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ 6,54,000 रू किमतीचा एकूण 54 कीलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

सदर गांजा संशयित व्यक्ती चोरटी विक्रीच्या उद्देशाने अवैधरीत्या आपल्या कब्ज्यात बाळगून होते. परंतु पोलिसांची रेड पडत असल्याचे कळताच संशयित व्यक्ती गोपाल मेहरबान पावरा (रा. लाकड्या हनुमान ता. शिरपूर) व त्याचा सासरा तानक्या पावरा (रा. कांजण्यापाडा ता. शिरपूर) हे अंधाराचा फायदा घेऊन तेथून पसार झाले.

याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस ठाण्याचे सहायक सपोनि. उमेश बोरसे हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या