समाजकार्य महाविद्यालयाचे गारबर्डी आणि पाल शिबीर उत्साहात

लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर आणि ग्रामिण शिबिराचा समारोप

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीर आणि बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष व एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गाचे ग्रामिण शिबिर दिनांक15 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत गारबर्डी आणि पाल ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराचा समारोप दि. 21 जानेवरी 2025 रोजी संपन्न झाले.

सदर शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्र कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे यांच्या शुभहस्ते झाले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. पी. आर. चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सातपूडा विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक झांबरे, सरपंच रतन बारेला ई. उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुनिता चौधरी यांनी केले. प्रास्ताविक कल्पना भारंबे यांनी केले. तर आभार डॉ. भारती गायकवाड यांनी केले.

तसेच समारोप कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष स्थानी शिबिर समन्वयक म्हणून डॉ. वाय. जी. महाजन होते. तर प्रमुख अतिथि म्हणून मा. सुधाकर झोपे यांच्या प्रमुख उपस्थित झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिमा पाटिल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. कल्पना भारंबे यांनी केले. शिबिरार्थी विद्यार्थी महेश अहिरे, व इतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार डॉ. कल्पना भारंबे यांनी केले.

सदर शिबिर प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गारबर्डी येथे सरपंच रतन बारेला यांच्या उपस्थीतीत वनराई बंधारा तयार केला. तसेच गारबर्डी आदीवीसी गावातील रस्ते सफाई केली. तसेच याच गावात पोस्टर प्रदर्शन, वृक्षारोपन, सामाजिक सर्वे, आणि पथनाट्य यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गावातील सर्व नागरीकांनी व ग्रामसेवक आणि सरपंच व विविध पदाधिकारी आणि कृषि विज्ञान केंद्र पाल येथिल कर्मचारी व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

ग्रामिण शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांनी पाल येथे जलसंधारण आणि मृदा संधारणाचे कामे केले आहेत. तसेच आदिवासी लोकांची वस्ती या गावातील विविध सामाजिक समस्या याविषयी माहीती संकलीत करून त्यावर आधारीत संशोधन कार्य पूर्ण केले आहे. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयावर आधारीत गटचर्चा केल्या.

विशेष ग्रामिण शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना बौध्दिक सत्रात विविध डीजीटल लिटर्सी आणि आजचा युवक, राष्ट्रवाद आणि आजचा यूवक, शास्वत विकास आणि मानसिकता, पर्यावरण आणि सेंद्रीय शेती यासारख्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. साधन व्यक्ती म्हणून डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ. सी. पी. लभाणे, डॉ. भूषण राजपूत, डॉ. वाय. जी. महाजन यासारख्या विविध तज्ञ साधन व्यक्ताने मार्गदर्शन केले.

सदर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरासाठी डॉ. भारती गायकवाड, डॉ. अशोक हनवते, डॉ. दिपक महाजन यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तर सदर ग्रामिण शिबिरासाठी समन्वयक म्हणून डॉ. वाय. जी. महाजन यांनी तर सहसमन्वयक म्हणून डॉ. सुनिता चौधरी, डॉ. भूषण राजपूत, डॉ. कल्पना भारंबे, किशोर भोळे यांनी सह समन्वयक म्हणून कामकाज केले. तर सदरील शिबिरसाठी 130 विद्यार्थी शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.