फिफा वर्ल्डकपमुळे जीवघेण्या कॅमल फ्लूचे सावट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जगभरात कोरोना (Corona) विषाणूने थैमान घातले होते. आता कुठे तरी जग या भयंकर संकटातून बाहेर पडत आहे. त्यातच आता परत नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे.

कतारमध्ये (Qatar) कोविड सारख्या अतिशय संसर्गजन्य अशा विषाणूचा संसर्ग झाला आहे. सध्या सौदी अरेबियातील कतार येथे सध्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं (FIFA World Cup 2022) आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी जगभरातील फुटबॉल चाहते कतारमध्ये पोहोचले आहेत. मात्र या चाहत्यांद्वारे हा नवा विषाणू जगभरात पसरेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कतारमध्ये कॅमल फ्लू (Camel Flu) या रोगाचा प्रसार होताना पाहायला मिळत आहे.

कॅमल फ्लू काय आहे ?

कॅमल फ्लू अतिशय वेगाने पसरणारा रोग आहे. हा विषाणू औषधांचा शरीरावर होणारा परिणाम पाहता म्यूटेट होतो, म्हणजे स्वत:ची रचना बदलतो. त्यामुळे कॅमल फ्लूमुळे जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. कॅमल फ्लू कोरोना विषाणूप्रमाणेच संसर्गजन्य आजार आहे. या आजाराची लागण कॅमल (Camel) म्हणजे उंटापासून माणसाला झाली आणि त्यातून त्याचा अधिक प्रसार झाला. आता संपूर्ण जगावर कॅमल फ्लूचं सावट आहे.

जगाची चिंता वाढली

डॉक्टरांनी सांगितलं की, कतार हा वाळवंटी प्रदेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात उंट आढळतात. कॅमल फ्लूचा विषाणू फक्त उंटांमध्ये आढळतो. हा विषाणू उंटापासूनच लोकांपर्यंत पसरतो. कतारमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी जगभरातून लोक पोहोचत आहेत. लोक उंटावर स्वार होऊन त्यांच्या संपर्कात येत आहेत. अशा परिस्थितीत हा विषाणू अधिक लोकांपर्यंत पसरू शकतो. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी कतारला जाणाऱ्या प्रवाशांना सफारी आणि राइड दरम्यान उंटांना हात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कॅमल फ्लूची लक्षणे ?

या विषाणूच्या संपर्कात येताच अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. याची लागण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. ताप, कोरडा खोकला, घसा खवखवणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. रुग्णाला न्यूमोनिया होण्याचीही शक्यता असते. काही रुग्णांना जुलाब आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू होण्याचा धोका असतो.

कॅमल फ्लूची ओळख

कॅमल फ्लूच्या विषाणूला मर्स (MERS) म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (Middle East Respiratory Syndrome) या नावानंही ओळखलं जातं. पहिल्यांदा हा विषाणू 2012 मध्ये सौदी अरेबियामध्ये आढळला होता. त्यानंतर कॅमल फ्लू मध्य पूर्वेकडील देशांमध्ये पसरला. या विषाणूचा धोका पाहता लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जर एखादी व्यक्ती मध्यपूर्वेतील देशांमधून प्रवास करून येत असेल, तर त्याला प्रथम कोविड RTPCR चाचणी करणं आवश्यक आहे. खोकला, ताप, सर्दी, घसादुखी यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास विलंब न करता तपासणी करावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.