Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»आजीच्या अंत्यविधीसाठी आल्या अन् शेततळ्यात..
    अपघात

    आजीच्या अंत्यविधीसाठी आल्या अन् शेततळ्यात..

    मन हेलावणारी घटना : शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2026No Comments403 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कोल्हापूरच्या चंदगडमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा हंडेवाडी येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २५ मे सोमवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रिया आणि धनुष्का यांच्या वडिलांची आई तसेच स्वराच्या आईची आई असलेल्या सुशीला सांबरेकर (वय ७०) यांचे आठ दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने कुटुंबीय हंडेवाडी येथे जमले होते. सोमवारी दुपारी तिन्ही मुली गावाजवळील शेततळ्याजवळ गेल्या असता हा दुर्दैवी प्रकार घडला.

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, तिघींनाही बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. मृत मुलींमध्ये धनुष्का पांडुरंग सांबरेकर (वय १५), रिया चंद्रकांत सांबरेकर (वय १२) आणि स्वरा जयंत नाईक (वय १३) यांचा समावेश आहे. धनुष्का आणि रिया या दोघी मूळच्या आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील असून सध्या गोव्यातील पर्वरी येथे वास्तव्यास होत्या. तर स्वरा ही मूळची होसूर (ता. चंदगड) येथील असून सध्या उचगाव (ता. करवीर) येथे राहत होती.

    या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अल्पवयीन मुलींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif