Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक, ४ लाख रोजगार निर्मिती
    ताज्या बातम्या

    महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक, ४ लाख रोजगार निर्मिती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 1, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक, ४ लाख रोजगार निर्मिती

    मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ; ‘महाजिओटेक’ महामंडळाची स्थापना

    मुंबई I लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसमावेशक विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतिमानतेवर लक्ष केंद्रित करणारे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र (जीसीसी) धोरण २०२५ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले आहे. या धोरणामुळे राज्यात ५०,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, सुमारे ४ लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. हे धोरण २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. भारतातील जागतिक क्षमता केंद्रे उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

    ‘महाजिओटेक’ महामंडळाची स्थापना

    राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन नियोजनबद्ध प्रगती साध्य करण्यासाठी महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कंपनी कायद्यांतर्गत स्थापन होणाऱ्या या महामंडळासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद आणि १०६ पदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी) चे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत हे महामंडळ स्थापन होणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ या दृष्टिकोनाशी सुसंगत ३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नवीन जागतिक क्षमता केंद्रे आकर्षित करणे, संशोधनाला चालना देणे, उच्च मूल्यवान ज्ञानकेंद्रित गुंतवणूक वाढवणे, डिजिटल डेटाबँक विकसित करणे, वित्तीय आणि बिगरवित्तीय प्रोत्साहने देणे, व्यवसाय सुलभता आणि केंद्र-राज्य धोरणांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. यासाठीच जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५ आखण्यात आले आहे.

    या धोरणामुळे अवकाश आणि संरक्षण, कृषी आणि अन्न प्रक्रिया, रत्ने व दागिने, लॉजिस्टिक्स, धातू आणि खाणकाम, औषध निर्माण, अक्षय आणि हरित ऊर्जा, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह यासारख्या प्राधान्य क्षेत्रांना गती मिळेल. कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांनीही स्वतंत्र जागतिक क्षमता केंद्र धोरणे जाहीर केली आहेत.

    #maharashtra Cabinet Meeting MahaGeotech
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif