Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»16 मे पासून होणार सीए परीक्षा !
    शैक्षणिक

    16 मे पासून होणार सीए परीक्षा !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारत आणि पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आता या परीक्षा 16 मे ते 24 मेदरम्यान होतील. भारत-पाकमधील तणावामुळे सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मूळ वेळापत्रकानुसार या परीक्षा 9 ते 14 मे या दरम्यान नियोजित होत्या. या परीक्षा सुरक्षेच्या कारणामुळे काही शहरांमध्ये घेणे शक्य नव्हते. त्यामुळे आयसीएआयने परीक्षा स्थगित केल्या होत्या.

    आता 16 ते 24 मे दरम्यान या परीक्षा पूर्वीच्याच केंद्रांवर आणि पूर्वीच्याच वेळेनुसार होणार आहेत. परीक्षेच्या वेळा आणि केंद्रे आधीप्रमाणेच राहणार आहेत. या परीक्षा दुपारी 2 ते 5 आणि 2 ते 6 या वेळेतच होतील. मे सत्रातील सीए फाऊंडेशन परीक्षांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील. मे सत्रासाठी सीए फाऊंडेशनच्या परीक्षा 15, 17, 19 आणि 21 मे रोजी नियोजित वेळेनुसारच होणार आहेत, अशी माहितीही संस्थेने दिली.

    सुधारित वेळापत्रक

    शुक्रवार, 16 मे : फायनल परीक्षा (ग्रुप 2) पेपर 5 -इंडायरेक्ट टॅक्स लॉ/इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) पेपर 1 – इंटरनॅशनल टॅक्स-ट्रान्सफर प्रायसिंग, रविवार, 18 मे : फायनल परीक्षा (ग्रुप दोन) पेपर 6-इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स/आयएनटीटी-एटी पेपर – 2 – इंटरनॅशनल टॅक्स प्रॅक्टिस, मंगळवार, 20 मे :  इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप 2) पेपर 4 – कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, गुरुवार, 22 मे : इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप 2) पेपर 5 -ऑडिटिंग अँड एथिक्स, शनिवार, 24 मे: इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप 2) पेपर 6 -फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट.

    CA Exam
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    परीक्षा देऊनही TYBCA चे विद्यार्थी निकालात ‘गैरहजर’!

    May 31, 2026

    नीट परीक्षा 2026 ची परीक्षा अचानक रद्द!

    May 12, 2026

    रायसोनी महाविद्यालयात रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif