बाप रे..! असे केल्याने तुम्ही तुमच्या घरात.. : गंभीर इशारा
‘पाण्यात हळद’ टाकण्याचा ट्रेंड ठरू शकतोय इतका घातक?
लोकशाही न्यूज नेटवर्क
आजकाल सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड वेगाने पसरत आहे, जिथे लोक पाण्यात हळद मिसळून व्हिडिओ आणि रील बनवत आहेत. पण या ट्रेंड बाबत एक धक्कादायक इशारा एका ज्योतिषांनी दिला आहे. सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड खूपच गाजतोय. प्रत्येकजण रात्रीच्या गडद अंधारात पाण्यात हळद टाकत रील्स आणि व्हिडीओ अपलोड करतोय. पण असे करून ते लोक स्वतःसाठी संकट ओढवून घेत आहेत.
अरुण कुमार व्यास नावाच्या ज्योतिषींनी याबाबत इशारा दिला आहे. त्यांचा दावा आहे की, असे केल्याने तुम्ही केवळ नकारात्मक ऊर्जाच तुमच्या घरात आणत नाही, तर ही क्रिया भूत-प्रेतांना आमंत्रण देण्यासारखी आहे. ज्योतिषींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्स संभ्रमात आहेत की, या ट्रेंडमध्ये उडी घेऊन त्यांनी काही धोक्याला आमंत्रण तर दिले नाही ना.
ज्योतिषी व्यास यांचा दावा आहे की, पाण्यात हळद मिसळणे ही कोणतीही सामान्य प्रक्रिया नाही, तर ती एक तांत्रिक क्रिया आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये लोकांना सावध करत सांगितले की, चुकूनही असे करू नये, कारण यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. इतकेच नाही, तर तुमच्यावर भूत-प्रेतांचा सायाही पडू शकतो.
त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कृतीमुळे तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरू ग्रह कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो. शिवाय, यामुळे तुमची मानसिक स्थितीही बिघडू शकते. ज्योतिषींचा दावा आहे की, ही पूर्णपणे नुकसानकारक प्रक्रिया आहे, ज्यामुळे तुमच्या घरात संकट येऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्या.
(डिस्क्लेमर : लोकशाहीने सदर माहिती ही उपलब्ध असलेल्या स्रोतावरून दिली आहे. मात्र याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही, याचे नोंद घ्यावी..)