धक्कादायक… व्यावसायिकाने कुटुंबासहित स्वतःला जाळून घेतले…

0

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खापरी पुनर्वसन परिसरात एका व्यावसायिकाने (Businessman) स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलाला देखील यात जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेत व्यावसायिकाचा मात्र मृत्यू झाला. सुदैवाने त्याची पत्नी व मुलगा बचावले आहेत. रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

रामराज भट हे पत्नी संगीता आणि मुलगा नंदन यांच्यासोबत खापरी पुनर्वसन परिसरात गेले असता. त्यांनी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी आणि मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खापरी इथल्या स्वामी विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला अॅसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं. परंतु पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते पिण्यास नकार दिला.. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारला. पत्नी आणि मुलाला काही कळण्याआधीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा मृत्यू झाला.

रामराज भट यांचा नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते माल पुरवण्याचे काम करायचे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे भट आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर आहे. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.