Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चालत्या बसला आग, २० प्रवाशांचा कोळसा !
    ताज्या बातम्या

    चालत्या बसला आग, २० प्रवाशांचा कोळसा !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चालत्या बसला आग, २० प्रवाशांचा कोळसा !

    १६ जण गंभीर : जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थैयत गावाजवळील घटना
    जैसलमेर: राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थैयत गावाजवळ मंगळवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका चालत्या एसी स्लीपर बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    प्रत्यक्षदर्शींच्या मते, आगीने काही क्षणांतच संपूर्ण बसला विळखा घातला. जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी चालत्या बस मधून उड्या मारल्या, तर काहींना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. बसमध्ये एकूण ५७ प्रवासी होते, त्यापैकी दोन मुले आणि चार महिलांसह १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारांसाठी जोधपूरला हलवण्यात आले. काही जखमींवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक
    जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी सांगितले की, आग इतकी भीषण होती की बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी फक्त मृतदेह आणि जळालेले अवशेष शिल्लक आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी जोधपूरहून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम पाठवण्यात आली आहे.

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपये व जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Bus fire jaislmer
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif