मनवेल ता. यावल
साकळी गाव ते मनवेल महादेव मंदिर पर्यत रस्ता काँक्रीटीकरण सुरु असल्यामुळे मनवेल थोरगव्हाण शिरागड बस बंद असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी प्रवाशीवर्गाचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. साकळी ते शिरागड हा अकरा कीलोमीटर रस्ता असुन साकळी गावापासुन सुरुवात होत असल्यामुळे ऐन गावापासुन रस्ता काँक्रीटीकरण होत असल्यामुळे पर्यायी रस्ता नसल्यामुळे बससेवा बंद आहे.
साकळी व यावल येथे शिक्षणाकरीता येजा करणाऱ्या विद्यार्थी मोठ्या सख्यने असल्यामुळे बस अभावी शाळेत जात नसल्यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या परीसरात केळी लागवाड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे केळीचा ट्रक साकळी येथून पिळोदा फाटा मार्गे मनवेल थोरगव्हाण पथराडे शिरागड या रस्त्याने जे जा सुरु आहे.
साकळी पिळोदा फाटा ते थोरगव्हाण पथराडे शिरागड रस्ता चागला असुन यामार्गी बससेवा सुरु झाल्यास प्रवाशी व विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल अशी मागणी पालक वर्गातुन होत आहे.