Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भरदिवसा घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास
    गुन्हे वार्ता

    भरदिवसा घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2026No Comments197 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शहरातील यशवंत कॉलनी परिसरात भरदिवसा घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी संधी साधत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    भुसावळ शहरातील यशवंत कॉलनी परिसरात शोभा सुधाकर जयकारे (वय 45) ह्या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. 16 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यास घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेधडकपणे घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी केलेल्या या हातसफाईत तब्बल 1 लाख 12 हजार 653 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यात सोन्याच्या अंगठ्या, कानातले दागिने, लहान चिपा आणि चांदीचे दागिने तसेच रोख रकमेचा समावेश आहे. घरी परतल्यानंतर शोभा जयकारे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्वरित भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    September 16, 2026

    उत्सवाला गालबोट : गणपती मिरवणुकीत घुसला कंटेनर

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif