Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!
    अपघात

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    वडनगरी येथे शोककळा : परिवारावर दु:खाचा डोंगर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2026No Comments318 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    कामधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याला नियतीने वाटेतच गाठले. गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाडी जात असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खड्ड्यात गाडी उलटल्याने वडनगरी येथील 55 वर्षीय शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली.

    वडनगरी येथील रहिवासी असलेले दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय 55) आणि त्यांचे सहकारी चिंतामण नाईक हे दोघे दररोजप्रमाणे सरपंच दत्तू रामचंद्र पाटील यांच्या खेडी भोकर शिवारातील शेतात मजुरीसाठी जात होते. सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास त्यांची बैलगाडी गिरणा नदीच्या पात्रातून जात होती. मात्र, नदीपात्रात असलेल्या एका खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक बैलगाडी उलटली. या संकटकाळात चिंतामण नाईक यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी घेतली, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दुर्दैवाने, दिलीप कल्याणकर यांना सावरण्याची संधी मिळाली नाही आणि ते खोल पाण्यात बुडाले.

    घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवून शोध मोहीम सुरू करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर दिलीप कल्याणकर यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. या दुदैवी घटनेत एक बैल बचावला तर दुसरा बैल देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

    परिवारावर दुःखाचा डोंगर

    मयत दिलीप कल्याणकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेण्यात आला असता, नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. एका कष्टाळू शेतकऱ्याच्या अशा अचानक जाण्याने वडनगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif