Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»विजेची तार तुटून पडल्याने बैलाचा मृत्यू
    अपघात

    विजेची तार तुटून पडल्याने बैलाचा मृत्यू

    पेरणी आटपून कुटुंबासह घरी परततांनाची घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 29, 2026No Comments204 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मुख्य वीज तार तुटून रस्त्यावर पडलेली असताना त्यावर गेलेल्या बैलगाडी च्या बैलाला विजेचा धक्का लागून बैल जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घोसला शिवारात जोगेश्वरी रस्त्यावर घडली. यामध्ये बैलगाडी मध्ये असलेल्या चार ते पाच जणांनी उड्या मारल्या ने ते बचावले आहेत पेरणी करून घरी येत असताना हा प्रकार घडला. या घटनेत शेतकरी शब्बीर रुस्तम तडवी व त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले. ऐन खरीप हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

    नांदगाव तांडा शिवारातील गट क्रमांक ७३ मध्ये शब्बीर तडवी यांची सुमारे एक हेक्टर शेती आहे. रविवारी पेरणीचे काम पूर्ण करून ते बैलगाडीतून कुटुंबासह घरी परतत होते. दुपारी अचानक पाऊस व वादळी वाऱ्याचा जोर वाढला. दरम्यान रस्त्यावर येत असताना मुख्य वीजवाहिनीची तार तुटून रस्त्यावर पडली होती. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून बैलगाडी जात असताना बैलाचा पाय जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे जोरदार विजेचा धक्का बसून बैलाचा जागीच मृत्यू झाला.

    या घटनेत शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी सतर्कता बाळगून तातडीने गाडीतून उड्या मारल्या. मात्र शेतीसाठी उपयोगी असलेल्या बैलाचा मृत्यू झाल्याने शब्बीर तडवी यांचे एक लाख रु चे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम सुरू असतानाच बैल गमावल्याने पुढील शेतीची कामे कशी करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    घटनेची माहिती मिळताच महावितरणचे लाईनमन सूर्यवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी जोगदंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महावितरण ने घटनेचा  पंचनामा केला. मात्र महसूल चे कोणीही घटनास्थळी दाखल झाले नव्हते या शेतकऱ्यांला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif