बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या जळगाव खान्देश कोल्ड स्टोरेजचे शुभारंभ सोहळा

0

बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या जळगाव खान्देश कोल्ड स्टोरेजचे शुभारंभ सोहळा

ग्राहक मेळाव्याचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी

बुलडाणा अर्बन संस्थेच्या जळगाव खानदेश मालकीच्या कोल्ड स्टोरेजचा (शीतगृह) शुभारंभ सोहळा व ग्राहक मेळाव्याचे भव्य आयोजन मंगळवार दि. 18 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जळगाव शहरातील विमान तळ जवळ शाकंभरी माता मंदिर जवळ चिंचोली जळगाव परिसरातील बुलडाणा अर्बन कोल्ड स्टोरेज अँड लॉजिस्टिक पार्क जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे

आशिया खंडातील सहकार क्षेत्रात सर्वार्थाने प्रथम क्रमांकावर असलेली व सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेली तसेच “सहकार तत्व जनहिताला महत्त्व” या बोधवाक्याला वाहिलेल्या बुलडाणा अर्बन संस्थेच्या स्वयं मालकीचे कोस्ट स्टोरेज चेनच्या नवव्या क्रमांकाचे ५७०० मे. टन क्षमतेचे जळगाव खान्देश कोल्ड स्टोरेज चा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून याठिकाणी ग्राहक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल झंवर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांची प्रमुख उपस्थिती असून संस्थेचे संचालक मंडळ देखील उपस्थित राहणार आहे.

तिरुपती बालाजी, माहूरगड, शिर्डी, तुळजापूर येथे भक्त निवास सुविधा, सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथे सीबीएससी पॅटर्न निवासी शाळा व संस्थेच्या 22 ठिकाणी शाळेतून 29 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येत आहे. बुलडाणा येथे वेद विद्यालय, मोर्शी येथे गोरक्षण धाम तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांकरता धान्य साठवण्याची व्यवस्था असे अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात.

बुलडाणा अर्बन संस्थेच्या मालकीचे धर्माबाद येथे तीन शीतगृह तसेच चिखली, मलकापूर, भुसावळ, वर्धा, परभणी जळगाव खान्देश या ठिकाणी देखील शीतगृह तयार करण्यात आले असून याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या शीतगृहांमध्ये हरभरा, तूर, वाटाणे, शेंगदाणे यासह शेतमाल पशुखाद्य सुस्थितीत शेतकऱ्यांना ठेवता येणार आहे. त्यामुळे आयोजित कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुलडाणा अर्बन परिवारातर्फे करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.