Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»बापरे.. आईच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ
    महाराष्ट्र

    बापरे.. आईच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    निसर्गापुढे मानव काहीच करू शकत नाही. निसर्ग अनेक चमत्कार घडवत असतो. अशीच एक खळबळजनक घटना बुलढाणामधून समोर आलीय.  एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली होती. मात्र त्या महिलेच्या पोटात जे बाळ होतं, त्याच बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ असल्याचे उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षांची एक महिला 3 दिवसांपूर्वी सोनोग्राफी करण्यासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या महिलेला आधी 2 अपत्यं असून ती तिसऱ्यांदा गर्भवती आहे. सोनोग्राफी करताना त्या महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आलं. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करण्यास सक्षम होतात. मात्र महिलेच्या पोटात बाळ आणि त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले. 9 महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे.

    मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे ही अशी घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणत: 5 लाख गर्भवती महिलांमध्ये एखादीच्या बाबतीतच अशी केस एखादी आढळते. सध्या त्या बाळाच्या जीवाला काहीही धोका नाही, मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांनी दिली आहे. त्या बाळाचा जन्म झाल्यानतर परिस्थिती काय असेल, त्यानुसार निर्णय घेऊ, त्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेऊ असेही डॉक्टरांनी नमूद केलं.

    buladhana
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif