Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    लोकशाही विशेष

    दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 7, 2026No Comments187 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    देशाची राजधानी नवी दिल्ली येथील साउथ बँकोकमधील सत्य निकेतन येथील पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि या इमारतीत राहणारे दिल्ली विद्यापीठाचे ४० ते ५० विद्यार्थी यात दबले गेल्याचा संशय आहे. सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. बाकी एनडीआरएफ आणि दिल्लीतील पोलिसांचे बचावकार्य सुरू आहे. अनेक महानगरपालिकेचे बंब आणि जेसीबी येथे दाखल झाले असून, त्यांच्या वतीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. काल, रविवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास या सत्य निकेतन इमारतीच्या तळमजल्यावर काहीतरी काम सुरू होते. सुमारे ५० वर्षे जुनी असलेली ही इमारत तळमजल्यावरील कामामुळे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पाच मजली इमारत एका क्षणात जमीनदोस्त झाली. इमारत पडली तेव्हा प्रचंड ढिगाऱ्याखालून आवाज येत होते. ज्यांच्याजवळ मोबाईल फोन होते, त्यांचे क्षीण आवाज तेवढे येत होते. ‘बचाव, बचाव’ एवढ्या आवाजावरून या ढिगाऱ्याखाली कुणीतरी आहे, एवढे मात्र निश्चित असे ऐकणाऱ्याला वाटत होते. जेसीबी व इतर साहित्याने सदरचा प्रचंड ढिगारा जसजसा उचलला जाऊ लागला, तसतसे काही लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले जात होते.

    या इमारतीत प्रत्येक रूममध्ये एक, दोन किंवा एक ते तीन असे विद्यार्थी राहत होते. आपण शिकण्यासाठी राजधानी दिल्ली येथे देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून एक स्वप्न घेऊन आलो आहोत. त्या स्वप्नांचा अशा पद्धतीने चुराडा होईल, याची पुसटशी कल्पनाही त्यांच्या मनात आली नसणार. बिचाऱ्या मुलांचे स्वप्न भंग पावले, त्यांचा चुराडा झाला. जे सहा विद्यार्थी यात मृत पावले, त्यांच्या नातेवाईकांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांच्या मनावर कसा परिणाम झाला असेल, याची कल्पनाही करवत नाही. जे काही जखमी विद्यार्थी होते, त्यांना ढिगाऱ्याखालून काढल्यानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. कोणाचे तरी हात तुटलेले, कुणाचा पाय निकामी झालेला, कुणाचे डोळे गेले, अशी ही जखमी विद्यार्थ्यांची अवस्था पाहवत नव्हती. जगले तरी ते शंभर टक्के तंदुरुस्त न राहता अपंगत्वाचे जीवन जगतील, अशी त्यांची अवस्था आहे. हे झाले विद्यार्थ्यांचे. त्या व्यतिरिक्त या सत्य निकेतन इमारतीमध्ये काही कुटुंबेही राहत होती. त्या कुटुंबांपैकी बहुतेक जण दबून एकतर मृत्यू पावले अथवा ढिगाऱ्याखाली मरणयातना भोगत असावेत.

    सत्य निकेतन इमारत कोसळल्याची बातमी आल्यानंतर तीस तास झाले, तरी ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त किती जणांना या ढिगाऱ्याखालून सुखरूप काढता येईल, त्या दृष्टीने दिवस-रात्र बचावकार्य सुरू आहे. ३० तासांनंतर सत्य निकेतन इमारतीचे मालक हरी ओम मंजर यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यार्थी म्युनिसिपल कमिशनरविरोधात आंदोलन करत आहेत. हे वृत्त कळताच गृहमंत्री अमित शहा यांनी आपला नियोजित गोवा दौरा अर्धवट सोडून नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बचावकार्य सुरू आहे. रस्ते तुटतात, पूल तुटतात; परंतु आमचे आमदार, खासदार, मंत्री हे या जमिनीवर कधी दिसत नाहीत, ही किती क्लेशदायक बाब आहे.

    दुर्घटना ही सांगून घडत नाही. ती अचानक घडते. ती एकदाच घडते; पण हाहाकार उडवून जाते. सुदैवाने जो अपघात झाला आहे, तो राजधानी दिल्लीत झाला आहे. या ठिकाणी पंतप्रधानांपासून ते सर्व मंत्री, सर्व खासदार व आमदार यांचे वास्तव्य असते. कोणत्या दिवशी काय घडेल, याची कुणाला कल्पना नसते. पण रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीतरी विचार ही मंडळी करू शकते. पन्नास वर्षे जुनी इमारत झाली आहे. ती इमारत माणसे राहण्याच्या लायकीची आहे किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार तर या मंडळींना निश्चितच असला पाहिजे, असे सर्वसामान्यांना वाटते. पन्नास वर्षे जुनी इमारत आणि मुळात पाऊस धो-धो कोसळत आहे. त्यातच तळमजल्यावर काहीतरी काम काढले जाते आणि ते काम करत असताना ही पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते. याला काय म्हणावे? या कृतीला जबाबदार कोण? आज ४० ते ५० विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांचा दोष काय? तेव्हा या दुर्घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

    मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना भरीव अशी आर्थिक मदत देण्याची गरज आहे. जे जखमी झाले आहेत, त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. ही दुर्घटना नवी दिल्लीत झाल्याने तेथील केंद्रीय सरकार आहे, तसेच दिल्ली सरकारचे देखील राज्य आहे. दोन्ही सरकारांनी मिळून त्यांना भरीवशी आर्थिक मदत करू शकतात, ती केलीच पाहिजे. हे सर्व होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहणारी जनता संतप्त झाली आहे. सर्वसामान्य जनता केंद्र सरकारला प्रथम दोषी ठरवून त्यांना शिव्यांची लाखोली वाहत आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही देणेघेणे नसते. ते प्रथमदर्शनी केंद्र सरकार व दिल्लीतील राज्य सरकारला दोषी ठरवणे ठरवते आणि आपला उरला-सुरला संताप त्यांच्यावर व्यक्त करते. सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल, तर त्यांची मने जिंकणे हे तुमचे कर्तव्य आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!

    October 14, 2026

    ऑक्टोबर हीट : बदलत्या हवामानाचे वास्तव

    October 13, 2026

    चित्रपट सृष्टीतील अवलिया अष्टपैलू : किशोर कुमार

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif