अमरावतीत बिल्डींग कोसळली; 5 ठार, 4 जखमी… अजूनही लोक दबल्याची भीती…

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अमरावती शहरात प्रभात चौकातील शिकस्त 2 मजली इमारत रविवारी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकूण 5 जण मलब्याखाली गाडले गेलेत तर एकाला जखमी स्थितीत बाहेर काढण्यात आले आहे. बाकी 4 जणांना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विनमध्ये पाठविण्यात आले.

दरम्यान, त्यांची स्थिती फारच गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून मिळाली. पाच जणांना मलब्याखालून अग्नीशमन विभागाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यानंतरही मलबा हटविण्याचे काम सुरू होते. यासाठी तीन जेसीबीचा वापर करण्यात आला.

शहरात चार महिन्यांत दुसरी इमारत कोसळल्याची ही गंभीर घटना घडली आहे. याआधी गांधी चौकातील इमारत 14 जुलै रोजी कोसळली होती. परंतु, इमारत कोसळणार याची आधीच माहिती मिळाल्याने दुकानातील सर्वच जण बाहेर पडले होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली होती. परंतु, आज व्यावसायिक इमारत कोसळून त्याखाली पाच जण गाडले गेल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या नोटीस कडे दुर्लक्ष

इमारत शिकस्त असल्याने महानगर पालिकेद्वारे या इमारतीच्या मालकांना तीन नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तिसऱ्या नोटीसमध्ये तर इमारत पाडण्याचा इशारा मनपाने दिला होता. परंतु, त्याकडे तळमजल्यावरील पाचही दुकानदारांनी लक्षच दिले नाही. या इमारतीबाबत मालक जैन आणि पाचही दुकानदारांमध्ये न्यायालयात वाद सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.