Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»अखेर ‘त्या’ जवानाला पाकिस्तानने भारताकडे सोपवलं
    राष्ट्रीय

    अखेर ‘त्या’ जवानाला पाकिस्तानने भारताकडे सोपवलं

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारत पाकिस्तानमध्ये तणाव अजूनही कायम आहे. त्यातच मोठी बातमी समोर आलीय. BSF जवान पूर्णब कुमार साहू पाकिस्तानातून परतले आहेत. भारताने सुद्धा पूर्णब कुमार साहू यांच्या बदल्यात पाकिस्तानी रेंजर्सना परत पाठवलय. जवान पीके साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवलय. ते अटारी बॉर्डरवरुन परत आले आहेत. बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. त्यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानी रेंजर्सच्या एका सैनिकाला पकडलं होतं. आता दोन्ही देशांनी जवान आणि रेंजर्सच एक्सेंज केलं आहे. जवान आणि रेंजर्सची एक्सेंज करण्याची प्रक्रिया सकाळी 10.30 वाजता अटारीमध्ये झाली.

    बीएसएफकडून जवान भारतात परतल्याची माहिती देण्यात आली आहे. आज बीएसएफ जवान पीके साहू परत आले. 23 एप्रिल 2025 पासून ते पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होते. पीके शॉ यांना 10.30 वाजण्याच्या सुमारास संयुक्त चेक पोस्ट अटारीवरुन भारताकडे सोपवण्यात आलं. हँडओव्हर शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार झाल्याच बीएसएफकडून प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलय.

    सध्या भारत-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. दोन्ही देशांकडून मिसाइल आणि ड्रोनद्वारे परस्परांवर हल्ले करण्यात आले. भारताने पाकिस्तानला दहशतवादाविरोधात सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. आता दोन्ही देशांमध्ये सीजफायर झालं आहे. सीजफायरनंतर 14 मे रोजी बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्सनी आपपाल्या भागात पकडलेल्या जवानांना शांततामय मार्गाने परस्परांना परत केलय. फिरोजपूर येथे पाकिस्तान सीमेजवळ पाक रेंजर्सनी भारताच्या जवानाला अटक केली होती. दुसरीकडे बीएसएफने राजस्थानात भारतीय सीमेजवळ पाकिस्तानी रेंजरला पकडलं होतं. जवानाच्या बदल्यात भारताने सुद्धा पाक रेंजरला पाकिस्तानला सोपवलं आहे.

    राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे भारत-पाकिस्तान इंटरनॅशनल बॉर्डरवर बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला अटक केली होती. पाक रेंजर बॉर्डर क्रॉस करुन भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी सीमेवर सर्तक असलेल्या जवानांच्या नजरेत ही गोष्ट आली. त्यानंतर रेंजरला पकडण्यात आलं. आता भारताने पाकिस्तानी रेंजरला एक्सेंजच्या बदल्यात परत केलय.

    बीएसएफ जवान पूर्णब कुमार साहू 23 एप्रिलपासून पाकिस्तानच्या ताब्यात होते. साहू यांनी अलीकडेच पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात भारत-पंजाब सीमेवर ड्युटीवर रुजू झालेले. 23 एप्रिल रोजी झिरो लाइनजवळ शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याची मदत करताना चुकून ते पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेले. त्याचवेळी पाकिस्तानी बॉर्डरवर तैनात असलेल्या रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. पीके साहू पश्चिम बंगालच्या हुगळीचे निवासी आहेत.

    BSF Jawan P K Sahu retrurn to India:
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026

    ठरले! ‘या’ तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

    June 4, 2026

    राजधानी दिल्ली हादरली : हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव!

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif