Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»डोक्यात लोखंडी रॉड मारत वृद्ध महिलेचा निर्घृण खून
    गुन्हे वार्ता

    डोक्यात लोखंडी रॉड मारत वृद्ध महिलेचा निर्घृण खून

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 6, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाचोरा तालुक्यातील वाडी गावाजवळील शेवाळे येथे लोखंडी रोड वृद्ध महिलेच्या डोक्यात टाकून खून झाल्याची घटना ५ जुन रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रे व कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून अज्ञात चोरटे फरार झाला. घटने प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक धनंजय वेरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम, डाॅग स्काॅडला पाचारण करण्यात आले होते.

    डाॅग स्कॉड गावातच सुगावा काढत असल्याने वृद्ध महिलेचा मारेकरी हा गावातीलच असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. यामुळे पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस प्रकरणाची कसून चौकशी करीत असून लवकरच आरोपी हाती लागणार असल्याचे माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली. ‌वृद्ध महिलेचा मृतदेह सविस्तर पंचनामा करुन रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

    शेवाळे येथील कृष्णराव माहरु पाटील हे येथील दुमजली बांधलेल्या घरात राहत असून त्यांचे वृद्ध जनाबाई पाटील (वय – ८५) या शेजारील मातीच्या घरात एकट्या राहत होत्या. गुरुवारी कृष्णराव पाटील यांच्या मित्राच्या मुलाचा पाचोरा येथे वाढदिवस असल्याने ते रात्री साडेअकरा वाजताच्या दरम्यान घरी आले होते. कृष्णराव बाहेरगावी गेल्याची खबर कोणालातरी लागल्याने रात्री साडेदहाचे पावणे अकरा वाजेचे दरम्यान सदरचा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे.

    घरी गेल्यानंतर आई झोपलेल्या ठिकाणी गेल्या असता आई जनाबाई माहरु पाटील हिचा खून झालेला त्यांच्या निदर्शनास आला. अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात रोड टाकून डोक्याचे दोन तुकडे केले होते व गळ्यातील एक तोळा सोन्याची पोत आणि कानातील दोन तोळे सोन्याच्या बाळ्या ओरबाडून चोरटे पसार झाले होते. वृद्ध महिलेस मृत अवस्थेत पलंगाच्या खाली टाकून त्यावर अंथरूण पांघरून दिलेल्या अवस्थेत वृद्ध महिला आढळून आली. यामुळे कृष्णराव यान आरडाओरड केल्यानंतर गावात एकच खळबळ माजली त्याक्षणी पिंपळगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले.

    पोलिसांनी तातडीने एलसीबी टीम डॉग स्कॉट व फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना बोलावून संबंधित घरातील ठसे घेण्यात आले, घटनास्थळी पिंपळगाव हारे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पो. काॅ. नामदेव इंगळे, पो. काॅ. राहुल बेहरे, पो. काॅ. नरेंद्र नरवडे, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अजयसिंग परदेशी, एलसीबीचे जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील यांचे सह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी उपस्थित झाला होता. डॉग स्कॉटने गावातच भ्रमण केल्याने संशयीत आरोपी हे गावातीलच असल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. वृद्ध महिलेचे शव विच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif