Sunday, November 27, 2022

गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळला, 100 लोक अजूनही पाण्यात अडकल्याची भीती…

- Advertisement -

 

- Advertisement -

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

गुजरातमधील मोरबी भागात मच्छू नदीत आज केबल पूल कोसळला. (A cable bridge collapsed in Machu river in Morbi area of Gujarat today) या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूल कोसळला तेव्हा सुमारे 500 लोक त्यावर होते, असे सांगण्यात येते. घटनास्थळी बचावकार्य जोरात सुरू आहे.

वृत्तानुसार, मोरबीमध्ये आज झुलता पूल कोसळला. जवळपास 100 लोक अजूनही पाण्यात अडकल्याची भीती आहे. चार दिवसांपूर्वी दुरुस्ती करून पूल खुला करण्यात आला.

मोरबी केबल ब्रिज हा अनेक वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक पूल होता. दुरुस्ती आणि जीर्णोद्धार केल्यानंतर, गुजराती नववर्षानिमित्त २६ ऑक्टोबर रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बचाव कार्यासाठी तातडीने पथके तैनात करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथील अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना PMNRF कडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रत्येक जखमीला 50,000 रुपये दिले जातील.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या