Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मोजणीच्या कामासाठी शेतकऱ्याकडून 71 हजारांची लाच
    गुन्हे वार्ता

    मोजणीच्या कामासाठी शेतकऱ्याकडून 71 हजारांची लाच

    जळगावातील भूकरमापकासह डेटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026No Comments272 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक आणि कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटरला 71 हजार 700 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या कारवाईनंतर भूमिअभिलेख विभागात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी संशयितांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही सुरु असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    या प्रकरणातील संशयित राहुल ताराचंद कोळी (32) हे भूमिअभिलेख विभागात भूकरमापक म्हणून कार्यरत असून, कल्पेश सोमनाथ पाटील (32) हा कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर आहे. जळगाव तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याने गट क्रमांक 6 मधील शेतजमिनीच्या गट हिस्सा व पोटहिस्स्याच्या पडताळणीसह मोजणीसाठी भूकरमापक कार्यालयात नियमानुसार अर्ज करून शासकीय शुल्क भरले होते. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही कामाचा निपटारा करण्यासाठी भूकरमापक राहुल कोळी याने तक्रारदाराकडे त्यांच्या भावाच्या उपस्थितीत 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

    लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार शेतकऱ्याने 17 जुलै रोजी जळगाव एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवली. एसीबीने पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत लाचेच्या मागणीला दुजोरा मिळाला. याच दरम्यान कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर कल्पेश पाटील यानेही नोटीस पाठवण्याच्या नावाखाली 625 रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचे समोर आले.

    ठरल्याप्रमाणे बुधवारी भूकरमापक राहुल कोळी हा एका खासगी मदतनीसासह प्रत्यक्ष मोजणीसाठी शेतकऱ्याच्या शेतात गेला. मोजणी पूर्ण झाल्यावर त्याने तक्रारदाराला करंज (ता. जळगाव) येथील बसस्थानकाजवळ बोलावले. तेथे त्याने स्वतःसाठी व कार्यालयासाठी 70 हजार रुपये, दोन वेळा नोटीस पाठविल्याबाबत 1,200 आणि खासगी मदतनीसासाठी 500 अशी एकूण 71 हजार 700 रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

    दरम्यान करंज बसस्थानकाजवळ आधीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही संशयितांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच ताब्यातील संशयितांना अटक करण्यात येणार आहे. लाचेची मागणी, त्यामागील कारणे तसेच यापूर्वी अशा प्रकारे इतरांकडूनही पैसे उकळले गेले होते का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif