Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»Breaking : सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द,12 वीची परीक्षा पुढे ढकलली
    ताज्या बातम्या

    Breaking : सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द,12 वीची परीक्षा पुढे ढकलली

    By April 14, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

    सीबीएसई बोर्डाच्या लेखी परीक्षेला 4 मे पासून सुरुवात होणार होती. सध्या देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द करा, अशी मागणी सोशल मीडियावर केली होती.  विद्यार्थ्यांच्या या मागणीला अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परीक्षा रद्द करावी किंवा दुसरा मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. नरेंद्र मोदी यांनी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या  परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीची परीक्षा रद्द

    केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली आहे. दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

     फरार आरोपी विनोद तराडचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif