मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे, यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांना सौम्य लक्षणं असली तरी त्यांना आयसीयुमध्ये हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
लता मंगेशकर 92 वर्षांच्या आहेत. लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये झाला आहे. त्या दीनानाथ मंगेशकर यांच्या मोठ्या लेक आहेत.