Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»Breaking : राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद ; काय असतील नियम?
    ताज्या बातम्या

    Breaking : राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद ; काय असतील नियम?

    By April 4, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई: राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच लॉकडाऊनची नियमावली उद्या रात्री 8 वाजता जारी करण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.  राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत.  तसेच गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

    असा असेल लॉकडाऊन

    >> उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू

    >> रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी

    >> मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू

    >> सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार

    >> इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही

    >> बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार

    >> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय

    >> शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार

    >> सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, बस, रेल्वे, टॅक्सी बंद राहणार नाहीत, पण त्यांच्यातील प्रवासी क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif