Breaking : कर्जाचे हफ्ते होणार आणखी स्वस्त; रेपो दरात पुन्हा घट

0

नवी दिल्ली : कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व व्यवसाय बंद आहेत. यामुळे देशाला दररोज ३५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, देशवासीयांना दिलासा देण्यासाठी  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेतली. रिव्हर्स रेपो रेटमध्ये आणखी ०.२५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय दास यांनी आज जाहीर केला. चालू रिव्हर्स रेपो रेट आता ३.७५% झाला आहे. रेपो दर मात्र आहे असाच ठेवण्यात आला आहे. भारताकडे सध्या ७ महिने पुरेल एवढं परकीय चलन शिल्लक असून जागतिक प्रयत्नांच्या आधारे भारताचा येत्या वर्षातील विकासदर ७.४% पर्यंत जाईल असा विश्वासही दास यांनी व्यक्त केला. गव्हर्नरांच्या या निर्णयामुळे गृह, वाहन कर्जे स्वस्त होणार आहेत. याशिवाय बाजारात चलन तुटवडा जाणवू नये, यासाठी 50 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीची घोषणा दास यांनी केली.

बँक आणि आर्थिक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धन्यवाद, देशाला कोरोनाच्या संकटामध्ये अविरत मदत करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी प्रयत्नशील. अन्य देशांच्या तुलनेत  भारताची आर्थिक स्थिती बरी आहे. जी २० देशांपेक्षा मजबूत अर्थव्यवस्था असून सर्व घडामोडींवर आरबीआयची नजर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे आश्वासन  आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले. अंधारलेल्या काळात आपल्याला प्रकाशाकडे पहायचे आहे, असेही दास म्हणाले.

कोरोनासंकटामुळे भारताचा GDP 1.9 टक्के राहील जो G20 देशांमध्ये सर्वाधिक असेल”, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. इतकंच नाही तर कोरोनामुळे जगभरात 9 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 70 हजार कोटी रुपयांचं नुकसान होईल, अशी भीती दास यांनी व्यक्त केली. यंदा पाऊसही १०० टक्के होणार आहे. हे दिलासादायक आहे. कोरोनाचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणत आहे. कोरोनामुळे निर्यात घटली आहे. तसेच वीजेची मागणीही कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्री घटली आहे. बाजारात चलनाची कमतरता भासू न देणे. बाजारांचे कामकाज प्रभावित न होऊ देणे हे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.