नवी दिल्ली: राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचं नवं सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहे. कारण दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आजची बैठक संपली असून बैठकीत सत्ता स्थापनेच्या सर्व मुद्द्यांवर एकमत झाले आहे. दरम्यान, उद्या आम्ही आमच्या निवडणुकीतील मित्रपक्षांशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करूनच महाआघाडीची अंतिम घोषणा करू आणि त्यानंतरच राज्यपालांना भेटू, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
आजच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज दोन्ही काँग्रेसची दुसरी बैठक पार पडली. त्यात सर्व मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. त्यामुळे आता आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. उद्या मुंबईत गेल्यावर आमच्या आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा करू. त्यांना संपूर्ण तपशील दिला जाईल. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करू आणि नंतरच तिन्ही पक्ष मिळून अंतिम घोषणा करू. त्यानंतर राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेबाबतची पुढची कार्यवाही करण्यात येईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
Prithviraj Chavan, Congress: Congress & NCP have completed discussions on all issues. There is complete unanimity. Tomorrow in Mumbai, we will have meeting with our other alliance parties. Later in the day, we will have discussion with Shiv Sena. #Maharashtra pic.twitter.com/Fkpx3PshL0
— ANI (@ANI) November 21, 2019
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकानंतर लवकरच महाशिवआघाडीचे सरकार प्रत्यक्ष सत्तेवर येण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेना 14, राष्ट्रवादी 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे देण्याचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सुत्रांकडून समजते.