सोन्या-चांदीच्या दरवाढीला ब्रेक; शुक्रवारी सोन्यात मोठी घसरण, चांदीही स्वस्त

0

मुंबई- सोन्या-चांदीच्या दरांमध्ये आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या दरांना अखेर आज ब्रेक लागला असून २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ८,००० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव घसरून १,७०,६२० रुपयांवर आला आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७,५५० रुपयांची तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ६,१७० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून १ किलो चांदीचा भाव १५,००० रुपयांनी कमी झाला आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे आजचे दर
मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ, नागपूर, विजयवाडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम आणि म्हैसूर या शहरांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १७,०६२ रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,६४० रुपये असून १८ कॅरेट सोन्याचा दर १२,७९७ रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड आणि अयोध्या येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति ग्रॅम १७,०७७ रुपये नोंदवण्यात आला आहे. या ठिकाणी २२ कॅरेट सोन्याची किंमत १५,६५५ रुपये तर १८ कॅरेट सोन्याची किंमत १२,८१२ रुपये प्रति ग्रॅम आहे. दक्षिण भारतातील चेन्नई आणि मदुराईसारख्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १७,६७३ रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १६,२०० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १३,५०० रुपये प्रति ग्रॅम आहे.

चांदीचे आजचे दर
दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, अहमदाबाद, वडोदरा, जयपूर, लखनऊ, पटना, सुरत आणि चंदीगड या शहरांमध्ये आज १ किलो चांदीचा दर ३,९५,००० रुपये आहे. तर चेन्नई, हैदराबाद, केरळ, मदुराई, विजयवाडा, भुवनेश्वर, कटक आणि विशाखापट्टणम येथे आज चांदीचा भाव प्रति किलो ४,१५,००० रुपये आहे. या शहरांमध्ये १० ग्रॅम चांदीची किंमत ४,१५० रुपये तर १०० ग्रॅम चांदीची किंमत ४१,५०० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.