पारोळ्यात आज रथोत्सव

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असा पारोळ्यातील ब्रम्होउत्सवातील आज रथोत्सव तसेच महाराष्ट्र सर्वात उंच जवळपास ५३ फुट उंची असलेल्या पारोळ्यातील रथोत्सव आज दि. ६ रोजी या रथयात्रेला दुपारी मान्यवरांच्या हस्ते तसेच पारंपारिक आर्चक पुजारी संजय पाठक यांच्यासह सहकाऱ्यांच्या वतीने मंत्रोच्चारात पुजा करून सुरूवात केली जाणार आहे.

पारोळा तालुक्यात ग्राम दैवत म्हणून ओळख असलेल्या प्रभु बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सव मागील दहा दिवसांपासून शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या ब्रह्मोत्साहातील महत्त्वाचा भाग म्हणजे रथोत्सव. आज या रथाची रथ यात्रा पारोळा येथे भरते. या रथयात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभु बालाजीचे दर्शन घेत आपले जीवन सार्थकी लावातात. या रथोत्सवात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन आपले जीवन सार्थकी लावावे असे आवाहन बालाजी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ही रथयात्रा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावी व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पारोळा पोलिस स्टेशनच्या वतीने पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह प्रशासनाने केले आहे.

आज “श्रीं” चा रथोत्सव दुपारी १ वाजता बालाजी मंदिराच्या आवारातुन (रथचौकातुन) सुरु होईल. सरळ रथगल्लीने कै. निवासभाऊ यांच्या घरावरुन सरळ वाणी मंगल कार्यालय, आझाद चौकात येऊन उत्तरेस झपाट भवानी चौकातून सरळ भोई गल्लीने श्रीराम मंदिर येथे सायंकाळी आरती होऊन तेथून कासार गल्लीने रात्री उशिरापर्यंत रथ चौकात येईल. याप्रसंगी सर्व भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन बालाजी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.