Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापर करतांना मूल्यांची कास सोडू नये !
    जळगाव

    डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापर करतांना मूल्यांची कास सोडू नये !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 15, 2025Updated:March 15, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
    डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतांना मूल्यांशी फारकत होत आहे हे वास्तव जरी असले तरी मूल्यशिक्षणासाठी सर्व घटकांनी संगठीत प्रयत्न केल्यास या आव्हानास आपण सहज परतवू शकू असा आशावाद राष्ट्रीय शिक्षण परीषदेत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला.

    इंटरनेट, स्मार्ट फोन, कृतिम बुद्धीमत्ता, सोशल मीडियाच्या या डिजिटल युगात मूल्यशिक्षण समोरील आव्हानांवर दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन ब्रह्माकुमारीज्‌ शिक्षण प्रभाग, जळगाव आणि लेवा एज्युकेशन युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारीज्‌ दिव्य प्रकाश सरोवर, सावखेडा येथे करण्यात आले आहे.

    संमेलनाचे उद्घाटन रितू ठक्कर, मिनाक्षीदीदी, प्राचार्या गौरी राणे, डॉ. सोमनाथ वडनेरे, धीरज सोनी, मिलन भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय संमेलनात डॉ. वैष्णवी खैरनार, हेमलतादीदी, वर्षादीदी, प्रा. अविनाश कुमावत, राजदीदी यांनी केले. बीके तेजल, बीके दिपशिखा यांनी सूत्रसंचलन केले.

    तंत्रज्ञानाचा योग्य वापर समाज प्रगतीस आवश्य आहे, लहान मुलांच्या हातात आलेला स्मार्ट फोन, शालेय अभ्यासक्रमापासून उच्च शिक्षणापर्यंत होणारा डिजिटलचा वापर पाहता स्वनियंत्रण, स्वनियमन आणि स्व अनुशासन या त्रिसूत्रीचा वापरच मूल्यशिक्षणाचा प्रभावी वापरासाठी आवश्यक आहे असल्याचे मत रितू ठक्कर यांनी व्यक्त केले.
    परिवार हा मूलांची पहिली शाळा असल्याने पालकांनी व परिवारातील घटकांनी डिजिटलचा योग्य वापराकडे लक्ष द्यावे आणि स्वत:च नियंत्रीत आणि योग्य वापर केल्यास मूल्यशिक्षण पाल्यांमध्ये देणे शक्य होईल असे प्रतिपादन बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनी केले. सर्व क्षेत्रातील वाढत्या कृतिम बुद्धीमत्तेचा वापरासाठी आध्यात्मिक बुद्धीमत्तेचा वापर प्रत्येक क्षेत्रात केल्यास निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन संमेलन समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

    Brahmakumari jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif