Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»मनसे आंदोलनाला गालबोट : मंत्र्यावर भिरकावली बाटली
    राजकारण

    मनसे आंदोलनाला गालबोट : मंत्र्यावर भिरकावली बाटली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मीरा-भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची परवानगी मिळाल्यानंतर हजारो मराठी भाषिक मीरा रोड रेल्वे स्टेशनजवळ जमा झाले आहेत. मीरा-रोड स्टेशनजवळील मराठी भाषिकांचं आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. मराठी भाषिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मंत्री प्रताप सरनाईक घटनास्थळी पोहोचले. मात्र, आक्रमक झालेल्या मराठी भाषिकांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याचदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावल्याचीही घटना घडली.

    मीरा रोड रेल्वे स्टेशनजवळ सुरु असलेल्या मोर्चाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी हजेरी लावली. त्यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकाने मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावली. यावेळी आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक गो बॅक, जय गुजरात अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

    मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मीरा रोडमध्ये पुकारण्यात आलेलं आंदोलन चिघळलं आहे. या मोर्चामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. शहरात पोलीस विरुद्ध आंदोलनकर्ते असं वातावरण काहीसं दिसू लागलं आहे. पोलीस मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

    दरम्यान, मराठी भाषिकांच्या मोर्चासाठी मनसे नेते नितीन सरदेसाई, संदिप देशपांडे यांनी लोकलचा प्रवास करून मीरा रोड येथील आंदोलनात सहभागी झाले. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे देखील आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात मनसे, शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif