दुचाकी झाडाला धडकली; दोघे जागीच ठार…

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असलेले प्रदीप पाटील (२3) आणि किशोर पाटील (31) हे दोघं तरुण कामानिमित्ताने चोपडा येथे गेले असता, दुपारी घरी परत येतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांची दुचाकी  (क्र. एमएच.१९ सीएच ३८९४) झाडाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, एकाची कवटीच फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे धरणगावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.